You are currently viewing न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण

न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण

न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे दि 12 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर साखळी उपोषण सुरू झाले आहे.

वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी या साठी 12 ते 17 ऑगस्ट साखळी उपोषण राज्यभर सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन देवून या बाबतीत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.

सिंधुदुर्ग मंडल कार्यालय कुडाळ येथे अध्यक्ष आनंद लाड व सचिव संजय गोवेकर , सचिन राघव,लोकेश सागवेकर महेश राऊळ , सर्वेश राऊळ , दिनेश राऊळ, राजेश दळवी, दिनेश तांबे, दर्शन देसाई प्रितेश हळदणकर, दर्शन देसाई यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे.

20 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्री यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे व 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे घरी पायी मोर्चा काढून तेथे आमरण उपोषण व आंदोलन होणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी योग्य तोडगा काढून त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा