You are currently viewing मालवणात १९ ऑगस्टला भव्य नारळ लढविणे स्पर्धा…

मालवणात १९ ऑगस्टला भव्य नारळ लढविणे स्पर्धा…

मालवणात १९ ऑगस्टला भव्य नारळ लढविणे स्पर्धा…

लाखोंच्या बक्षीसांचा होणार वर्षाव; महिलांसाठीही आकर्षक बक्षिसे…

मालवण

नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपातील नारळ लढवणे स्पर्धा १९ ऑगस्टला दुपारी बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

पुरुष गटातील स्पर्धेसाठी विजेत्याला एक लाख बक्षीस तसेच अन्य पारितोषिक असणार आहेत.

या स्पर्धेसाठी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण- ९०९६७२८०४८ यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. तसेच त्याच ठिकाणी महिला भगिनींसाठी आयोजित नारळ लढवणे स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, सन्मानचिन्ह तसेच लकी ड्रॉ सोन्याची नथ, चांदीचा करंडा, छल्ला यांच्यासह अन्य बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेसाठी नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भाजपा महिला शहराध्यक्षा अन्वेशा आचरेकर- ८१८०९८६८३३, तन्वी परब- ७५८८११७८०५ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष मोंडकर यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, संदीप शिरोडकर उपस्थित होते.

श्री. मोंडकर म्हणाले, नारळी पौर्णिमा हा किनारपट्टीवरील मोठा सण असून नारळी पौर्णिमेची ही संस्कृती सर्वत्र पोहचावी या उद्देशाने भाजपच्या वतीने नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन संस्था व रिक्षा चालक मालक संघटना यांच्यातर्फे मालवण भरड नाका ते बंदर जेटी अशी भव्य रिक्षा रॅली काढण्यात येते. या रॅलीनिमित्त आकर्षक रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना निलेश राणे यांच्या माध्यमातून अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

राजकोट किल्ला येथे राजकोट मित्रमंडळातर्फे होणाऱ्या नारळ लढविणे स्पर्धेतील २१ हजार रुपयांचे बक्षीसही निलेश राणे यांच्यामार्फत देण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. मोंडकर यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा