You are currently viewing प्रश्न सुटेपर्यंत जनता दरबाराच्या माध्यमातून पाठपुरावा करणार –  रविंद्र चव्हाण

प्रश्न सुटेपर्यंत जनता दरबाराच्या माध्यमातून पाठपुरावा करणार –  रविंद्र चव्हाण

प्रश्न सुटेपर्यंत जनता दरबाराच्या माध्यमातून पाठपुरावा करणार –
रविंद्र चव्हाण

लोकशाही दिनात प्रश्न सुटत नसल्यामुळे निर्णय…

सिंधुदुर्गनगरी

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनात अनेक प्रश्न सुटत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच जनता दरबार ही संकल्पना सुरू केली असून या जनता दरबारात उपस्थित झालेले प्रश्न निकाली निघेपर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे, असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत पालकमंत्री चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. आज पहिल्याच दिवशी कणकवली विधानसभा मतदार संघासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन या मतदार संघाचे आ नितेश राणे यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उप वनरक्षक नवकिशोर रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते ऍड अजित गोगटे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा