You are currently viewing उद्या १२ ऑगस्ट रोजी मालवण येथे नाभिक समाजाची बैठक

उद्या १२ ऑगस्ट रोजी मालवण येथे नाभिक समाजाची बैठक

मालवण :

 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केश केशर्तनाचे आधुनिक प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे विविध साहित्य याचे प्रदर्शन आणि मेकअप प्रशिक्षण अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे संदर्भात १२ ऑगस्ट रोजी मामावरेरकर नाट्यगृह मालवण येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. यात सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष व नामवंत मेकअपमन प्रसाद चव्हाण, सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे मुंबई जिल्हा अध्यक्ष व सुप्रसिद्ध हेअर स्टायलिश तुषार चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रशेखर सावंत हे मान्यवर व प्रशिक्षक (ट्रेनर) उपस्थित राहून सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सर्व पदाधिकारी व सलून कारागिरांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा