पुन्हा केर गावात हत्ती दाखल, भातशेतीचे अतोनात नुकसान
दोडामार्ग
गेले काही दिवस केर गावापासुन दूर असणारे रानटी हत्ती शुक्रवारी रात्री पुन्हा दाखल झालेत.
काही दिवस केर येथील हत्ती तळकट, कोलझर ते कुंभवडे पर्यंत पोहचले होते त्यामुळे येथील शेतकरी समाधानी होते. बरेच दिवस केर गावात हत्ती दिसत नव्हते शिवाय नुकसानही नव्हती. यावेळी गोपाळ देसाई, शिवराम देसाई, विनायक देसाई, नारायण देसाई आदी शेतकऱ्यांच्या भातशेतीचे त्यांनी नुकसान केले. काही शेतकरी आपल्या बागायतीत न गेल्याने आणखीन नुकसान समजू शकली नाही. वनविभागाला याबाबत कल्पना दिली असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.