You are currently viewing हात जोडतो, पण गवा रेड्यांचा बंदोबस्त करा…

हात जोडतो, पण गवा रेड्यांचा बंदोबस्त करा…

हात जोडतो, पण गवा रेड्यांचा बंदोबस्त करा…

हुमरमळा शेतकऱ्याचे वन अधिकाऱ्यांना गाऱ्हाणे:अतुल बंगे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसोबत वन अधिकाऱ्यांची बैठक..

कुडाळ :

हुमरमळा (वालावल) गावातील शेतकऱ्यांनी आज वन अधिकाऱ्यांना गवा रेड्यांच्या त्रासातून मुक्त करा असे गाऱ्हाणे घातले. गवा रेड्यांचा बंदोबस्त केला जाईल तसेच नुकसानभरपाई मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू अशी ग्वाही वन अधिकऱ्यानी वालावल-हुमरमळा येतेच झालेल्या बैठकीत दिली. शेतकऱ्यांना दिली. माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला.
हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेऊन गवा रेडे करत असलेल्या शेतीच्या नुकसानीबाबत गावात येऊन पहाणी करावी अशी मागणी केली होती. त्याला अनुसरून आज गणपती मंदिर करमळीवाडी येथे वनपाल दीनेश टिपुगडे, वनरक्षक सचिन पाटील,माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली, यावेळीउपस्थित शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत आम्हाला गव्या रेड्यांच्या त्रासातुन मुक्त करा अशी विनवणी केली. आम्ही कष्टाने आमच्या शेतात शेती करुन पोटापाण्यासाठी राब राब राबतो. याची नासधूस हे प्राणी करीत आहेत यातुन आम्हाला वाचवा अशी विनवणी या शेतकऱ्यांनी केली,
दरवर्षी गव्या रेड्यांमुळे आमच्या काजु,बागायती, आणि भात शेती याचे नुकसान होत आहे. दर वर्षी आम्ही कष्टाने उभ्या केलेल्या बागायती व भात शेतींची गवे रेडे नासधूस करताना पहातो. पण हे साश्रू डोळ्यांनी पाहण्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. म्हणून यांचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
यावेळी उपस्थित वन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देताना कोणत्याही त्रुटी न काढता नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही दिली. तसेच सौर कंपाऊंडसाठी शेतकऱ्यांना खास योजनेत पंधरा हजारपर्यंत अनुदान दिले जाते याची माहिती दिली. गव्या रेड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांचे मार्फत शासनस्तरावर विचार केला जाईल असे आश्वासनही दिले.
यावेळी वन अधिकाऱ्यांनी गवे रेड्यानी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन केली. मुसळधार पाऊस असुन सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, पोलीस पाटील उमेश शृंगारे, माजी सरपंच सुरेश वालावलकर, ओमकार गाळवणकर, किशोर वालावलकर, विजय पेडणेकर, मितेश वालावलकर, ऋषिकेश उपाध्ये, सुमन वालावलकर, गणेश केसरकर, महेश वालावलकर, आत्माराम वालावलकर,आशु देसाई, रमा मांजरेकर,अजित केसरकर, सचिन पेडणेकर , गणेश वालावलकर, संजय पेडणेकर, संदीप पेडणेकर,पंढरी गाळवणकर आदी शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा