You are currently viewing आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

वेंगुर्ला :

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा असे आवाहन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. वेंगुर्ला येथील बैठकीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून पक्षप्रवेश करण्यात आला.

वेंगुर्ला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याबाबतच्या सुचना सौ. घारे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसह होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनाबद्दलच मार्गदर्शन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी तालुक्यातील अनिल चुडजी, विलास चुडजी, संजय चुडजी, दिनेश चुडजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सौ. अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला अध्यक्षा दिपीका राणे, युवक अध्यक्ष शुभम नाईक, युवती अध्यक्षा अदिती चुडजी, सलिल नाबर, सुहास कोळसुलकर, अवधूत मराठे, स्वप्निल राऊळ, बबन पडवळ, ऋतिक परब आदींसह बुथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा