जिल्हा नियोजनच्या निधीतून मठ गावासाठी व्यायाम शाळा मंजूर…
वेंगुर्ले
जिल्हा नियोजनच्या निधीतून मठ गावासाठी दहा लाखाची व्यायाम शाळा मंजूर करण्यात आली आहे. भाजप नेते राजन तेली यांच्या सहकार्यामुळे ही मागणी मार्गी लागली, असा दावा उपसरपंच महादेव गावडे यांनी केला आहे. व्यायाम शाळा मंजूर झाल्याचे पत्र नुकतेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे दिले.
यावेळी सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच महादेव गावडे, समीर नाईक , प्रशांत बोवलेकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर ,सामजिक कार्यकर्ते अजित भाई नाईक, जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकार, तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, रोहित कोरगावकर, तेजस देसाई , साहील परब, राकेश मठकर, ,स्वप्निल मठकर, हितेश धुरी, जीवन कुडाळकर, हेमंत गावडे ,नारायण कुंभार, दशरथ गडेकर, निलेश धुरी, विराज बोवलेकर, गौरेश वायंगणकर, परेश बागायतकर, सत्यवान कुडाळकर, रोहित कुंभार आदी उपस्थित होते.