*वैभव नाईक यांनी काय केले असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे एक हाती सत्ता असून देखील सरपंच साहेब आपण काय केलं याचा विचार करावा…*
*शाखाप्रमुख सुनील करवडकर*
कुडाळ
आमदार वैभव नाईक यांनी वालावल ग्रामपंचायत आपल्या ताब्यात नसूनही गेले कित्येक वर्षे विविध कामांच्या माध्यमातून वालावल मधील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम अनियमितपणे केलेले आहे याचा विसर आपणास पडला की काय हे विचार करण्यासारखे आहे आमदार साहेबांनी लक्ष्मी नारायण तलाव दुरुस्ती साठी ९० लाख दीले ते तुम्ही मस्त जिरवलात.राजा प्रभु तुम्हाला एक हाती सत्ता फक्त तुमच्या लक्ष्मी नारायण मजुर बांधकाम संस्थेला ठेकेदारी मिळावी म्हणून तुमचा खटाटोप असुन ग्रामपंचायतीने कामांचा ठेका घेतला तर तुम्हाला टक्केवारी मिळणार नाही असा पलटवार वालावल शिवसेना शाखाप्रमुख सुनिल करवडकर यांनी केला, यापुढे बोलताना महाविकास आघाडीच्या सभेमध्ये वालावल ग्रामपंचायत ची जबाबदारी असलेली काम होत नसल्याची खंत व्यक्त केली होती यामध्ये कोणत्याही प्रकारचा आमदार खासदार निधीच्या संदर्भात काहीच बोललं गेलं नव्हतं परंतु झालेल्या बैठकीवर विद्यमान सरपंच श्री राजा प्रभु यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वर आरोप करताना वालावल पोष्ट ऑफिस ते बाजार पेठ रस्ता,बाजार पेठ कर्ली किनारी सुसज्ज जेठी,कोचरेकरवाडी,चौधरीवाडी, राऊळवाडी कर्लि नदी किनारी धुप प्रतिबंधक बंधारा ही कामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाली विसरू नये फक्त ही कामे लक्ष्मी नारायण मजुर संस्थेला मिळाली नाही म्हणून जळफळाट राजा प्रभु करीत आहेत,वालावल राऊळ वाडीची स्ट्रीट लाईट, नविन मंजुर केलेला रस्ता आमदार वैभव नाईक यांनी मंजुर केला मात्र या कामात कशा खो घातला पाहिजेत यासाठी प्रभु तुम्ही सक्रिय होता. सध्या चाळीस लाखाचे चार पाण्याचे पाट मंजूर झाले होते ते चाळीस लाख तुम्ही कसे जिरवलेत याची सध्या वालावल गावात खमंग चर्चा आहे.
वालावल निवारा बस स्टॉप,पुर्वभाग शाळा सभामंडप, वालावल हायस्कूल सभामंडप,कोडबसवाडी,धोंगडेवाडी रस्ता ही कामे आमदार वैभव नाईक यांनी मंजुर केली असताना त्या वेळचे शिवसेना पंचायत समिती सदस्य सौ.प्राजक्ता प्रभू मॅडम यांच्या पुढाकारातूनच झाली होती हे आपण विसरू नये त्यातही काही कामांच्या बाबतीत ग्रामपंचायतीकडुन कागदपत्रांची पुर्तता जाणुन बुजुन आपण केली नाही असे असतानाही ओडोसेवाडी रस्ता,गावधड महालक्ष्मी मंदिर रस्ता आमदार नाईक यांनी मंजुर करुन तुमच्या मजुर संस्थे्च्या नावे घेऊन त्याची मलय खाण्यात तुम्ही मग्न झालात हे आपण विसरत आहात.समतानगर मधील पुल बांधले त्याचे आमदार वैभव नाईक साहेब यांनी मंजूर केले व उदृघाटनही केले पण लावलेला बॅनर मात्र तुमच्या अंधभक्त कार्यकरत्यांनी फाडले, गेली कित्येक वर्षे वालावल ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार करत असुन ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करुन स्वतःची तुबडी भरत असताना ज्या लोकांनी जिवाचे रान करुन तुम्हाला सरपंच केले अशा आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना तुम्ही कसे आर्थिक स्वार्थासाठी बाजुला केलात हे वृत्त महायुती च्या नेत्यांना समजले. त्यामुळेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बैठकीच्या दरम्यान आपणास “राजा” जरा सबुरीने घे…हा दिलेला “संदेश”…. आपण विसरत चालला आहात त्याची प्रचिती सोशल मिडिया तुन वालावल वासियांना कळाली. महाविकास आघाडी ची वालावल मधील बैठक ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या सुख सुविधा व विकास कामांवर दुर्लक्ष करीत आहात यासाठी होती,गावाच्या हीतासाठी पुढाकार जेष्ठ नागरीकांनी घेतल्यानेच तुम्ही करत असलेली मनमानी वालावल वासीयांसमोर यायला लागली म्हणून तुमची जळफळाट होत आहे, आता यापुढे “हम करेसो कायदा” वालावल मध्ये खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना शाखाप्रमुख श्री सुनील करवडकर यांनी दिला.
______________________________
*संवाद मिडिया*
*👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻
*आ देखें जरा..किसमें कितना है दम…*
💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
*बॅक 2 बॅक टेस्ट ड्राईव्ह चॅलेंज*
तुम्ही घेत असणारी कोणत्याही कंपनीची कार
आणि टाटा पंच
यांची २०किमी ची *बॅक 2 बॅक* टेस्ट ड्राईव्ह घ्या
आणि मगच कोणती कार खरेदी करायची आहे ते ठरवा.
*तुम्ही बघत असलेल्या कार चा विक्रेता तयार आहे का हे चॅलेंज स्विकारायला..??*
✅आम्ही तयार आहोत..
मग विचारा तर *है क्या दम…???*
स्वातंत्र्य दिन निमित्त ₹.२७०००/-* पर्यंत चे विषेश ॲाफर सहीत..
*ऑफर्स १५ ॲागस्ट पर्यंत वैध*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*रतनजी टाटा यांचे संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*