You are currently viewing सरंबळ येथे एसटी मोटरसायकल अपघातात आयटी इंजिनियर शुभम परब याचा दुर्दैवी मृत्यू

सरंबळ येथे एसटी मोटरसायकल अपघातात आयटी इंजिनियर शुभम परब याचा दुर्दैवी मृत्यू

सरंबळ येथे एसटी मोटरसायकल अपघातात आयटी इंजिनियर शुभम परब याचा दुर्दैवी मृत्यू

कुडाळ

एसटी आणि मोटर सायकल त्यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सरंबळ येथील आयटी इंजिनियर शुभम विठ्ठल परब (वय वर्ष 25) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. गरीब परिस्थितीशी झुंज देत असताना एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वभावाने नेहमी हसतमुख असणाऱ्या शुभमच्या जाण्याने सरंबळ गावावरती तसेच मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हा अपघात सरांबळ तळेकर वाडी येथे घडला.

कुडाळ सरंबळ ही सकाळी 10:30 वाजता ची दैनंदिन एसटी फेरी आहे. कुडाळ वरून सरंबळकडे गाडी जात असताना अपघातातील मयत शुभम हा सरंबळ हुन कुडाळ कडे निघाला होता. अचानक गाडी समोर आल्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने थेट दोन गाड्यांमधील समोरासमोर धडक बसली ही धडक एवढी जोराची होती की यात शुभम गंभीर जखमी झाला तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शुभम यांच्यासोबत सरंबळ येथील रमेश जानकर वय 50 हे गंभीर जखमी झाले आहेत.

शुभम याला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान शुभम परब यांचा मृत्यू झाला. तर जखमी रमेश जानकर यांच्या हाता पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची मिळताच सरळ सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.

अपघातातील मयत शुभम परब यांच्या घरची परिस्थिती तशी गरीबीची आहे आई-वडिलांनी अत्यंत मेहनतीने शुभमला इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले होते. अगदी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये टॉपर असणारा शुभमने शालेय शिक्षणापासून इंजिनीयर होत पर्यंत प्रत्येक ठिकाणी टॉपर म्हणून ओळख होती. अष्टपैलू असणारा शुभम अभ्यासाबरोबर कला क्षेत्रात देखील हुशार होता. चित्रकला क्षेत्रात नावलौकिक असणारा शुभम याच्या चित्रांची सोशल मीडिया वरती अनेक चित्र प्रसिद्ध आहेत. फेसबुक इन्स्टा काम वरती नेहमी ऍक्टिव्ह असणारा शुभम चा मित्रपरिवार मोठा आहे. इंजीनियरिंग पूर्ण झाल्यानंतर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा त्याचा मानस होता. परंतु काळाने घाला घातल्याने त्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे शुभम परब याच्या पश्चात आई-वडील बहिण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा