हुमरमळा (वालावल)गावात गव्या रेड्यांचा हैदोस,भात शेतीचीची नासधुस..!
शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेत दिले निवेदन!
कुडाळ
हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी, बिजोळेवाडी,बांदकोडवाडी, येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आज करमळीवाडी येथील शेतक-यांनी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली वनअधिकारी संदीप कुंभार यांना निवेदन देण्यात आले,
हुमरमळा (वालावल) गावातील डोंगरांमध्ये वास्तव्य करुन असणारे गवे रेडे कळप च्या कळप भात शेती मध्ये उतरुन पुर्ण शेतीची वाट लावतात हा त्रास गेली कित्येक वर्षे चालू आहे याही वर्षी मोठ्या प्रमाणात कळप उतरले असुन शेतीची नासधूस करीत आहेत
या वर्षी मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना या रानटी प्राण्यांनी शेतक-यांच्या तोंडचा घास काढून घेत आहेत,
दरम्यान वनअधिकारी श्री संदीप कुंभार यांनी सांगितले कि उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता गणपती मंदिर येथे वनविभाच्या प्रमुख अधिकारी वर्ग यांच्या समवेत शेतक-यांची बैठक बोलावली असुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच श्री अमृत देसाई,यांनी केले आहे
यावेळी अतुल बंगे, शेतकरी,विजय पेडणेकर, किशोर वालावलकर,मोहन वालावलकर, आत्माराम वालावलकर,संजय पेडणेकर आदी उपस्थित होते