You are currently viewing तारकर्लीत इण्डेन गॕस एजन्सीला मनसे दणका…!

तारकर्लीत इण्डेन गॕस एजन्सीला मनसे दणका…!

मनसेच्या आंदोलन पवित्रामुळे गॕस एजन्सी नरमली;गावात येत असलेली अनियमित व विस्कळीत सेवा पुर्ववत करण्याचे दिले आश्वासन..

मालवण

मनसेच्या दणक्यामुळे इण्डेन गॕस एजन्सी नरमली. इण्डेन गॕस प्रतिनिधी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात तारकर्ली येथे झालेल्या बैठकीत चर्चेअंती तारकर्ली गावच्या गॅस वितरण प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. . या संदर्भातील अधिक वृत्त असे की, मालवण तारकर्ली येथील ग्रामस्थांना इंण्डेन गॅस एजन्सी मार्फत नियमित वेळेत गॅस सिलिंडर घरपोच केला जात नसल्याने ३० डिसें रोजी तारकर्ली येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण इंण्डेन गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक दिली होती. नियमित वेळेत घरपोच गॅस सिलिंडर देण्याबाबत निवेदन दिले होते या निवेदनात सेवा सुधारण्यासाठी येत्या ८ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.अन्यथा १० जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला होता.यावेळी उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, विभाग अध्यक्ष देवबाग मतदार संघ बजरंग कुबल, शाखाध्यक्ष तारकर्ली प्रसाद बापर्डेकर,मनविसे विभाग अध्यक्ष देवबाग मतदार संघ प्रतीक कुबल,मनविसे उपतालुकाध्यक्ष मालवण, संकेत वाईरकर,मनविसे शहराध्यक्ष मालवण, साईराज चव्हाण, उपतालुकाध्यक्ष विशाल माडये आदी उपस्थित होते. या निदेनाची दखल घेत इण्डेन गॅस एजन्सीचे श्री.एकनाथ सावंत यांनी तारकर्ली येथे जात मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली.गावांतील गॕस वितरण व्यवस्था विस्कळीत व अनियमित असल्याचे कबुल केले. या बैठकीवेळी इण्डेन गॅस एजन्सी तर्फे विस्कळीत असलेली सेवा सुधारण्याबरोबरच ग्रामस्थांना दर्जेदार सेवा देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.याबद्दल मनसे आणि ग्रामस्थांनी इण्डेन गॅस एजन्सी चे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा