You are currently viewing श्री रवळनाथ को-ऑप. हौ.फायनान्स सोसायटीतर्फे सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार

श्री रवळनाथ को-ऑप. हौ.फायनान्स सोसायटीतर्फे सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार

कुडाळ :

 

कुडाळ येथे श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी मध्ये सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून माजी शाखा चेअरमन प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, संस्थापक अध्यक्ष श्री एम एल चौगुले, सत्कारमूर्ती कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य राजकिशोर हावळ, रामेश्वर विद्यालय तळेगावचे सेवानिवृत्त शिक्षक श्री पंडित माने, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे श्री प्रमोद सावंत, ज्ञानदीप शिक्षण मंडळ सावंतवाडीचे मुख्याध्यापक श्री सलीम तकलीदार, जिल्हा पत्रकार संघाचे श्री प्रमोद म्हाडगुत, कुडाळ शाखेचे सल्लागार सागर तेली, कुडाळ शाखा सल्लागार मनोहर गुरवे, व्यवस्थापक विक्रम जांभेकर आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री एन एम चौगुले यांनी प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सेवानिवृत्त उपप्राचार्य, कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्रा. राजकिशोर हावळ व ज्ञानदीप शिक्षण मंडळ सावंतवाडीचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार विजेते श्री सलीम तकलीदार यांचा प्राचार्य. डॉ. श्रीकांत सावंत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. श्री रामेश्वर विद्यालय तळगावचे सेवानिवृत्त शिक्षक श्री पंडित माने व जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार विजेते श्री प्रमोद म्हाडगुत यांचा संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय चे सेवानिवृत्त अधीक्षक श्री प्रमोद सावंत यांचा सत्कार श्री अशोक येजरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुडाळ शाखेचे चेअरमन श्री अशोक येजरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा