You are currently viewing अवनुचो पाव्स

अवनुचो पाव्स

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*

 

*अवनुचो पाव्स*
(v/v/s……)

 

रंगबिरंगी अलर्ट बगीत
दिस ढकलतंय
वसरेक इला पाणी मिया
थुयच् गरयतंय

आषाढ झालो वशाड आणि
पूस कुदकुदला
नळे वोले, पारे वोले
दार श्याप फुगला

तरवो रवलो तळाक वरते
पाणी व्हावताहा
कोंचो माड कोंचा गाराफ
वाऱ्यार झेमताहा

पाव्स कसोय झालो तरी
लुकसान ठरलला
गुदस्ताचा बरा होता
अवनु फसफसला

व्हाळात आसा गाळ आणि
व्हाळये नायशे झाले १६०७०२२
इकासाच्या डांबरीकरणात
निम्मे गटार मेले

ओलो दुस्काळ जाहीर होयत्
तवसर शिधो खावया
तलाठ्याच्या पंचनाम्याक
वायच् हातभार लावया

नायतरी सरकार वाटताहाच
फुक्कट कोनाक नको?
राजा तुरुक फोडताहा
रयत साद्ता येको

असो आता कांबरान वोडतय
अळमी बरी मारलंय
बरी, इशारी फाल्या समजात
आता दियो मालय.

(भोवताल-3..काव्यसंग्रह)

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802……५७

प्रतिक्रिया व्यक्त करा