You are currently viewing संत बहिणाबाई

संत बहिणाबाई

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित “संत दर्शने काव्यमाला” मधील अप्रतिम काव्यरचना*

 

*संत बहिणाबाई*

 

वेळ गंगा नदी काठी

देवगाव रंगाऱ्याचे

जानकी आऊजी पोटी

जन्म बहिणाबाई

-१-

ओढ परमार्थ भक्ती

कथा पुराण श्रवण

सत्पुरुष सेवा दंग

संसारात विरक्त

-२-

गरीबी नि अशिक्षित

शेतात काम करीत

नामस्मरण सतत

पांडुरंगाचे घेई

-३-

अभंग येती ओठांत

भक्तीभाव आपसूक

कथा किर्तन श्रवण

जयराम स्वामींचे

-४-

तुकारामांचे अभंग

म्हणू लागली ती नित्य

दर्शनाचा घेई ध्यास

साक्षात तुकाराम

-५-

स्वप्नात दिले दर्शन

भक्तास गुरूपदेश

बदलले ते जीवन

गुरूबोधाने सारे

-६-

सातशे बत्तीस जरी

अभंग रसाळ सारे

वारकऱ्यांच्या मुखात

सहज येती मात्र

-७-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

द्वारा डॉक्टर साई प्रसाद बाबू

अनिका पिकॅडिली

ए-५०३

पुनावळे, पुणे-४११०३३

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा