You are currently viewing जेष्ठ नागरिकांनी ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ” लाभ घ्यावा

जेष्ठ नागरिकांनी ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ” लाभ घ्यावा

*जेष्ठ नागरिकांनी ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ” लाभ घ्यावा* —
*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग* .

*भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” मोफत फाॅर्म वाटप व मार्गदर्शन*

वेंगुर्ले

भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० – ३० वाजता ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी बार्टी संस्थेचे समता दुत सुहास मोचेमाडकर यांनी फाॅर्म भरण्यासंदर्भात माहीती दिली .
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई म्हणाले कि, ६५ वर्षांवरील किंवा त्यावरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी , तसेच मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात ” मुख्यमंत्री वयोश्री योजना ” राबवीण्यास सुरुवात केली आहे .
या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत , त्यामुळे पात्र वृद्धांना सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करता येतील . काही वृद्ध निराधार असतात , त्यांना वृद्धापकाळात आवश्यक असलेले साहीत्य उदा.चष्मा , ट्रायपॉड , कंबरे संबंधीचा पट्टा , फिल्डींग वाॅकर , ग्रीवा काॅलर , स्टिंक व्हीलचेअर , कमोड खुर्ची , गुडघा ब्रेस , श्रवणयंत्र इत्यादी वस्तु खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही . त्यामुळेच महायुती सरकार ने ही योजना सुरु केल्याची सांगीतले . तसेच तालुक्यातील ६५ वर्षावरील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन केले .
यावेळी ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना फाॅर्म देऊन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , महीला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , ता.का.का.सदस्य आनंद ऊर्फ बिट्टु गावडे , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर व नारायण गावडे , किशोर रेवणकर , कार्यालय प्रमुख छोटु कुबल व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी जवळ जवळ १५० महीला व पुरुष जेष्ठ नागरिकांनी फाॅर्म भरले .

_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात *

———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा