*विशाल परब यांच्याकडून मदतीचा हात..*
वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील सर्वेश सुरेश गावडे कामानिमित्त मुंबईला होता. वडिलांचा दीड वर्षांपूर्वी अचानक मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी आणखीनच वाढलेली होती. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काकांकडे रहात आयटीआय करून ठाण्यात एका खाजगी कंपनीत ॲप्रेन्टीसशिप करून नोकरीत कायम होणार अशी स्थिती असतानाच, विजेचा धक्का बसून सर्वेशने जगाचा कायमचा निरोप घेतला. आशेचा किरण दिसत असताना अचानकच हा दुर्दैवाचा धक्का गावडे कुटूंबाला बसला.
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना ही गोष्ट समजतात त्यांनी गावडे कुटुंबीयांना धीर देत काही आर्थिक मदत गावडे परिवारासाठी करून दिली. भाजपा पदाधिकारी सरपंच प्राची नाईक, माजी पं. स. सदस्य सौ स्मिता दामले, साक्षी राऊत, प्रवीण गावडे, विजय वालावलकर, तेजस जाधव, विक्रम सावंत, प्रमोद मेस्त्री, गोटू राऊळ, जितेंद्र राऊळ, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी गावडे कुटुंबीयांची भेट घेत विशाल परब यांनी केलेली आर्थिक मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली.