You are currently viewing पालकमंत्र्यांनी वर्षपूर्ती निमित्त तरी जिल्हा नियोजन समितीची सभा घ्यावी – राजेंद्र म्हापसेकर

पालकमंत्र्यांनी वर्षपूर्ती निमित्त तरी जिल्हा नियोजन समितीची सभा घ्यावी – राजेंद्र म्हापसेकर

गेल्या वर्षी सभा न घेतल्याने विकास कामांसाठी निधी मागता आला नाही…

ओरोस
जिल्हा परिषद मार्फत विविध योजना विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन कडून निधी उपलब्ध होतो. मात्र गेल्या वर्षभरात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभाच आयोजित न केल्याने अनेक कामांसाठी निधी मागता आला नाही असे सांगत पालकमंत्र्यांनी आता वर्षपूर्ती निमित्त तरी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करावी अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी कृषी समिती सभेत विविध मुद्यांवर चर्चा करताना केली.
रेडी येथील नदीतील गाळ काढण्याच्या विषयावर चर्चा झाली असता गाळ कोणी काढायचा असा प्रश्न कृषी विभागाकडून उपस्थित करण्यात आला. यावर विविध मुद्यांवर सभेत चर्चा केली जाते. मात्र त्यावर काही कार्यवाही केली जात नसल्याचे सांगत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान विभागामार्फत गाळ काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गाळ हा विषय संपूर्ण जिल्हाभर आहे. त्यामुळे नदी नाल्यातील गाळ काढून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा नियोजन कडे निधीची मागणी करा अशी मागणी सदस्यांनी केली. यावर आम्ही जिल्हा नियोजन समितीची सभा व्हावी अशी मागणी करत आहोत. जेणेकरून विकास कामांना निधी मिळावा तसेच अनेक विकास कामे मंजूर करता येतील, नवीन योजना राबविण्यात येतील मात्र अद्याप जिल्हा नियोजन समितीची सभा लागलेली नाही. मागील सभा २३ जानेवारी २०२० रोजी झाली होती. त्यानंतर आता एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप पर्यंत सभा झाली नाही. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. अनेक विकास कामांना मंजुरी मिळत नाही. नवीन योजना घेता येत नाहीत त्यामुळे जिल्ह्याचा विकास व्हावा नवीन योजना राबविण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी वर्षपूर्ती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी आज जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केली.

गाळ काढण्यासाठी नवीन योजना तयार करा

जिल्ह्यातील नदी नाल्यांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे या ठिकाणातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी कृषी विभागाने नवीन योजना तयार करावी आणि ती जिल्हा नियोजन समिती कडे सादर करावी अशी सूचना सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केली.

गाळ काढणाऱ्या मशीन जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात

नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. गेली अनेक वर्षे या मशनरी जिल्हा. प्रशासनाकडे उपलब्ध असतानाही त्यांचा अद्याप वापर झालेला नाही. त्या धूळ खात पडलेल्या असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. तसेच या मशनारी जिल्हा परिषद कडे वापरण्यासाठी देण्यात याव्यात अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा