You are currently viewing कृपा

कृपा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृपा*

 

बहरली सृष्टी, कृपा तुझी झाली

भेगाळली भुई, चिंब चिंब न्हाली।।धृ।।

 

आसमंती पसरे, हवासा मृद्गंध

जाई जुई फुले, वाटती सुगंध

सृष्टी पांघरते, शेला मखमाली

भेगाळली भुई, चिंब चिंब न्हाली ।।१।।

 

येता पाऊसधारा, मोराचे नर्तन

बदलते सृष्टी , तिचे आवर्तन

साजिरा शृंगार, कटी मेखला ल्याली

भेगाळली भुई , उंचचिंब चिंब न्हाली ।।२।।

 

ऊन पावसाचा ,खेळ रंगारंग

इंद्रधनू नभी, मन होई दंग

रंगांची नभात, वरात निघाली

भेगाळली भुई, चिंब चिंब न्हाली।।३।।

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा