You are currently viewing फुलतो सदाफुलीसम….

फुलतो सदाफुलीसम….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फुलतो सदाफुलीसम….*

 

व्हावे कुणापरी ते

केलाय चंग नाही…

अद्यापवर खुळाचा

केलाय संग नाही…।

 

भावो कुणास वा ना

चलतोय एकटा, पण…

पाठीस धावत्या गत

झालो सवंग नाही…।

 

जातेय जिंदगाणी

शिकण्यात माणसाची…

झालोय खास इतपत

केलाय रंग नाही…।

 

फुलतो सदाफुलीसम

कित्तेकदा असा, पण..

चुरचुर रगीत नुसता

झालोय तंग नाही…।

 

भावात मीपणाच्या

नुसताच दंग ऐसा…

उल्केसमान तुटुनी

झालोय भंग नाही…।

 

 

जपतो सुशांत ऐसा

सागर उरी निरंतर…

अवसेस नुस्त उठता

झालो तरंग नाही…।

 

(सवंग= स्वस्त…)

 

✍🏻शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा