You are currently viewing आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला श्रावण श्रावण* 

 

आला श्रावण श्रावण

मन भावन पावन

येई पाठीशी धाऊन

विठू सावळा श्रावण !!१!!

 

नाग पंचमीचा सण

जन्म अष्टमी श्रावण

राखी बांधून औक्षण

बंधू रक्षितो बहिण !!२!!

 

सर तुषार श्रावण

ऊन सावली श्रावण

ऐका कोकिळेचं गाणं

रान हिरवे श्रावण!!३!!

 

पडे भुरळ श्रावण

प्रेम वेडा हा श्रावण

कुठे जगात श्रावण

भुमि भारती श्रावण!!४!!

 

येता मास हा श्रावण

जातो बळी आनंदून

बैल खिल्लारी हो जोडी

सण पोळा मोल जाण !!५!!

 

नभी भिणला श्रावण

शेती मातीत श्रावण

राब राबून राबून

सोनं पिकवी श्रावण !!६!!

 

आला श्रावण श्रावण

लेकी भिजल्या नाचून

ढोल ताशे वाजवून

ताल धरती तरूण !!७!!

 

आला श्रावण श्रावण

पुलकित तन-मन

दवबिंदू तृणावर

मोत्या समान श्रावण !!८!!

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

8208667477.

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा