You are currently viewing विद्यार्थ्यांनी आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे – कॅप्टन डॉ. शंकर माने

विद्यार्थ्यांनी आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे – कॅप्टन डॉ. शंकर माने

*विद्यार्थ्यांनी आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे – कॅप्टन डॉ. शंकर माने*

काळाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करावे शिवाय शिक्षणातील चाकोरीबद्ध चौकट मोडून आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर निवडावे, असे प्रतिपादन प्रा कॅप्टन डॉ. शंकर माने सर यांनी केले. ते येरळामाई जनसहयोग फाऊंडेशन, हणमंत वडिये या संस्थेने आयोजित केलेल्या १० वी, १२वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा, मार्गदर्शन व सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अतिथी मार्गदर्शक म्हणून कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे केंद्र संचालक प्रा. अजयकुमार पाटील यांनी आपल्या अनुभव कथनाच्या माध्यमातून १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
श्री.पाटील यांनी दृढ निश्चय आणि सातत्य राखल्यानेच यशाच्या शिखरापर्यंत पोहचता येते, हे सांगताना त्यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा दाखला देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे सदस्य प्रा. डॉ. अशोक मोरे यांनी संस्था स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला, तसेच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व बुद्धीमत्ता यांची योग्य सांगड घातली तर शंभर टक्के यशस्वी व्हाल असा गुरूमंत्र दिला.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन, सर्टिफिकेट व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. शिवाय चालू वर्षात विशेष कामगिरी केल्याबद्दल सौ. रुपाली येवले, सौ. माधुरी मस्के, चि. आशिष मस्के या गुणवंतांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, गावचे सरपंच किशोर जाधव, उपसरपंच सतिश विलास मोरे, संस्थेचे सहसचिव विजय मस्के, अॅड. सुभाष पाटील, संजय मोरे, प्रा. संजीव मोरे, अनुराधा मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष मंडले यांनी केले तर आभार सौ. अनुराधा मोरे यांनी मानले.

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा