You are currently viewing मालवण नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.

मालवण नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.

*मालवण नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.

मालवण

शहरात विविध विकासात्मक कामे व उपक्रम नाविन्यपूर्णतेने राबविणाऱ्या मालवण नगरपरिषदेने; प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत क्षमताबांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छ्ता, लोकसहभाग, संस्थात्मक क्षमता निर्मिती इत्यादी. स्वच्छ भारत अभियानाची ध्येय तसेच अभियानाचे शाश्वत परिणाम साधण्यासाठी प्रशासनामध्ये संस्थात्मक आणि व्यक्तिगत क्षमता निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या क्षमता बांधणी कार्यशाळेस घनकचरा व्यवस्थापन तज्ञ व राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी श्री. सुभाष दळवी यांनी प्रशिक्षण दिले. श्री सुभाष दळवी यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राज्य समन्वयक ( स्वच्छ महाराष्ट्र अभियान) यापदावर तसेच मुंबई महापालिकेचे विशेष कार्य. अधिकारी (घनकचरा व्यवस्थापन/ स्वच्छ भारत अभियान) मुंबई यापदावर काम केलेले आहे.

त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना नेतृत्व विकास, लोकसहभागातून स्वच्छ माझे मालवण (नजरेत भरणारी स्वच्छ्ता), लोकसहभागातून शून्य कचरा व्यवस्थापन, पर्यटनाच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पिशवीचा मोह टाळा , माहिती शिक्षण व प्रसार, विकेंद्रित कचरा व्यवस्थापन, दळवी पॅटर्न- स्मार्ट कंपोस्टिंग सिस्टीम आणि सेंद्रिय शेती उपक्रम, कचरा वर्गीकरण, शाश्वत स्वच्छता, लोकसहभागातून स्वच्छतेचे धारावी मॉडेल, होम कंपोस्टिंग इत्यादी विषयांवर सूक्ष्म नियोजनासह सखोल मार्गदर्शन केले. या कार्याशाळेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन तज्ञ व प्रशिक्षक श्री. सुभाष दळवी यांचे कार्यालयीन निरीक्षक महेश परब, अवेक्षक सुधाकर पाटकर, लेखापाल दिनेश राऊत यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मंचावर सौ. रसिका कुलकर्णी व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मंदार केळुसकर हे उपस्थित होते. सुधाकर पाटकर यांनी मालवण शहराचा इतिहास व शहराची विशेषता याबाबत प्रशिक्षक श्री दळवी यांना व उपस्थितांना माहिती दिली. मालवण नगरपरिषदेचे लेखापाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्राथमिक स्वागत व प्रास्तावित झाल्यानंतर सुभाष दळवी यांच्या पुढाकारातून साकारलेल्या लोकसहभागातून स्वच्छतेचे धारावी मॉडेल या विषयावरील चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली व नंतर स्वच्छता मनापासून शहरापर्यंत या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ मालवण शहराचे ध्येय कसे साधले जाऊ शकते याबाबतच्या प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.

दडपण आणि ताण-तणाव हे कमी करण्याची गुरुकिल्ली समजावत स्वतातील नेतृत्व गुणाला वाव देऊन लोकाभिमुख ध्येयपूर्तीकडे वाटचाल करणेबाबत श्री दळवी यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली व उपस्थितांना प्रेरित केले.

लोकसहभागातून स्वच्छ माझे मालवण या संकल्पनेचा सूक्ष्म नियोजनात्मक आराखडा प्रशिक्षणार्थीना समजाविण्यात आला.

त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन तज्ञ व प्रशिक्षक श्री सुभाष दळवी यांनी लोकसहभागातून शून्य कचरा व्यवस्थापन, पर्यटनाच्या दृष्टीने स्वच्छ शहर व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पिशवीचा मोह टाळा , माहिती शिक्षण व प्रसार, विकेंद्रित कचरा व्यवस्थापन, दळवी पॅटर्न- स्मार्ट कंपोस्टिंग सिस्टीम आणि सेंद्रिय शेती उपक्रम, कचरा वर्गीकरण, लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता, होम कंपोस्टिंग इत्यादी विषयांवर स्वअनुभवांद्वारे सखोल मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या शेवटी उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांनी स्वच्छ माझे मालवणची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्लास्टिक निर्मुलनाचा संदेश देणारी ज्यूटची पिशवी व प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यावेळी मालवण नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन तज्ञ श्री दळवी यांना सन्मान पत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रशिक्षणास शहर अभियंता सोनाली हळदणकर, आनंद म्हापणकर, श्रद्धा आरेकर, राजा केरीपाळे, भास्कर राऊळ, शहर समन्वयक अनिकेत चव्हाण, खेमराज सावंत, मुकादम आनंद वळंजू, हेमंत आचरेकर, मिथुन शिगले, लुबना खान, वीणा पारधी, हर्षा थोटम, रेश्मा परुळेकर,करुणा गावकर, अक्षता गोसावी, वरुणराज अभ्यंकर, सुनील कादम, भाग्यश्री शिंदे, सदाशिव घाडीगावकर, बस्त्याव फर्नांडीस, लवू जोगी, रुपेश हडकर, संदीप घाडी, विश्राम जाधव आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन जिल्हा तांत्रिक तज्ञ निखिल नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा