You are currently viewing दीप पुजन

दीप पुजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्मिता रेखडे लिखित अप्रतिम लेख*

 

*दीप पुजन* 

 

‘ दीप सुर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्

गृहाण मत्कृतां पूजां सर्व काम प्रदोभव ‘

 

हे दिपक तु सुर्यरुप व अग्नीरुप आहे. तेजामध्ये तु उत्तम तेज आहे .माझ्या पूजेचा तु स्वीकार कर आणि सर्व मनोकामना पूर्ण कर.

उद्यापासून मनभावन लुभावणारा श्रावण सुरु होणार त्यातील पहिला दिवस हिन्दु सण परंपरेतील चैतन्यमय करणारा घराघरातून मंगलमय प्रकाश किरणांनी प्रसन्नता देणारा. दिव्यांना लख्ख चमकवुन उजळवुन त्यांची पुजा करुन घर सतत धन ,धान्य, ज्ञान, कर्तृत्व ,मनस्वास्थ ,शरीरस्वास्थ, समाधान ह्यानी उजळत राहु दे म्हणत चैतन्यदायी व अज्ञान रुपी अंधकाराला ज्ञान ज्योतीने लखलखीत सोन करणारा शुभदिन.

शुभ कार्याचे प्रतीक असलेल्या साग्रसंगीत दिपपुजना सोबत आजपासून विविध पत्री फुलांचे महत्त्व सुरु होते. पावसाळ्यात सुर्याचे तेज कमी होत असल्याने विजेचा शोध लागण्यापुर्वी घरातील उपयोगी उपलब्ध दिव्यांना चमकवुन उतराई होण्याचा मंगल सण. पचनशक्ती मंद होत असल्याने गत आहारात बदल करुन श्रावणात सात्विक आहार घेतात म्हणून गताहारी पण आपणच आपल्या संस्कृतीचे गटारी अमावस्या म्हणून मंगल सणाचा अपभ्रंश केला.

कालीया मर्दन केल्यानंतर यशोदा आणि गोपिकांनी कृष्णाचे औक्षवण करुन शुभचितंन केले होते. कृष्णासारखा आपला कुलदीपक, कुलदीपिका तेजस्वी,कर्तृत्ववान, गुणवान व्हाव्यात म्हणून वंशाचा दिवा,पणती यांचे औक्षवण करुन सणाचे पावित्र्य मंगलमय होते.

मनातील नकारात्मकता दुर करून प्रेमाची ज्योत जशी प्रज्वलित होते तद्वतच मागंल्याचे पुजक, त्यागाचे प्रतीक अंधकारनाशक कुठल्याही रूपातील प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञतापूर्वक पुजनाचा उत्साह आपुलकी व लक्ष्मीरुपात पुढील पिढीत रुजवण्यात सहज शक्य होते.

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा