You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये कौशल्यपूर्ण व मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये कौशल्यपूर्ण व मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये कौशल्यपूर्ण व मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा:**

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज दिनांक ३ ऑगस्ट २०२४, शनिवार या दिवशी कौशल्यरित्या व मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मैत्री दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘आरोग्याशी मैत्री’ या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजी जाधव यांनी उपस्थिती दर्शवली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शरीरयष्टी सुदृढ करणे हा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी जाधव यांचा छंद असून, व्यवसायाने ते सॉफ्टवेअर इंजिनिअर असले तरीही त्यांनी छंदालाच आपला व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. कार्यक्रमाची सुरुवात शालेय सहा. शिक्षिका कु. उमा बोयान यांनी माहिती देऊन केली. तर या उपक्रमाविषयी शालेय मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी माहिती दिली. तसेच, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला. या संवादात मुलांच्या आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी, जंकफूड खाल्ल्यामुळे होणारे नुकसान , स्वतःच्या शरीराची स्वच्छता, शरीराला असलेली कसरतीची गरज याविषयी माहिती सांगितली. यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर खेळणे गरजेचे आहे आणि हाच त्यांचा सर्वांगसुंदर व्यायाम आहे ही माहिती देऊन आपले आरोग्य कसे सुदृढ व निरोगी राहू शकते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी खेळ व व्यायमाबरोबरच अभ्यासही करणे तितकेच महत्त्वाचे आहे हे सांगितले. कारण सुदृढ शरिरातच सुदृढ मन वास करते. आणि सुदृढ मन सुदृढ समाज बांधणीसाठी आवश्यक असते. अशाप्रकारे, सुदृढ व निरोगी आरोग्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच, इयत्ता १ ते ३ री च्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतून फ्रेंडशिप बेल्ट देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना हा फ्रेंडशिप बेल्ट बांधून प्रेमाची व आपुलकीची भावना जपत मैत्रीपूर्ण नाते जोपासण्याचा या कार्यक्रमात मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आजचा हा मैत्रीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा