You are currently viewing “सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम ५ ऑगस्ट ऐवजी १० ऑगस्टला

“सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम ५ ऑगस्ट ऐवजी १० ऑगस्टला

 “सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम ५ ऑगस्ट ऐवजी १० ऑगस्टला

सिंधुदुर्गनगरी

 शासनाच्या वतीने दिनांक १ ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान महसुल पंधरवडा साजरा होणार आहे. सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होणार होता. तथापि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आता १० ऑगस्ट २०२४ राजी साजरा होणार आहे.

 या कार्यक्रमाअंतर्गत दि. १० ऑगस्ट २०२४ राजी जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्यावतीने जिल्ह्यातील वीरनारी, वीर माता वीर पिता यांनी सरकारी जमीन वाटप तसेच माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या महसूल विभागासंबंधीत व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच माजी सैनिकांनी मागणी केलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्याकरीता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

             या कार्मक्रमात माजी सैनिकांच्या प्रलंबित समस्याबाबत विशेषत: महसूल विभागाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्यां तसेच त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात विचारविनीयम करण्यात येणार आहे. तसेच शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांना शासनाकडून लागू असलेल्या ०५ एकर सरकारी जमीनबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.

            जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांच्या महसूल विभागासंदर्भातील समस्या व इतर काही प्रलंबित अडीअडचणी असल्यास तसेच जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी या प्रकरणांचा लेखीअर्ज व सर्व कागदापत्रासह व त्याबाबत यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता  व वीरपिता यांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३६२ २२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा