You are currently viewing महसूल पंधरवडा नियोजनात अंशत: बदल

महसूल पंधरवडा नियोजनात अंशत: बदल

महसूल पंधरवडा नियोजनात अंशत: बदल

नवीन शासन निर्णयाप्रमाणे उपक्रम राबविणार

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा १४ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा या उद्देशाने १४ ऑगस्ट  पर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. ३० जुलैच्या शासन निर्णयानुसार या पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये अंशत: बदल करण्यात आलेला असून त्याप्रमाणे पुढील प्रमाणे उपक्रमांचे नियेाजन करण्यात आलेले आहे.

             २  ऑगस्ट –    ”मुख्‍यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” कार्यक्रमाचे स्वरुप- या योजनेचा युवकांना जास्‍तीत जास्‍त लाभ देणेसाठी विविध दाखल्‍यांसाठी कॅम्‍प आयोजित करणे.

३  ऑगस्ट – ”मुख्‍यमंत्री तीर्थ दर्शन योजना” कार्यक्रमाचे स्वरुप- याअनुषंगाने ज्‍येष्‍ठ नागरिकांना तीर्थ स्‍थळांना भेट देण्‍यासाठी नमुद केलेले कागदपत्रे उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कॅम्‍प आयोजित करणे.

४  ऑगस्ट –  ”स्‍वच्‍छ व सुंदर माझे कार्यालय”  कार्यक्रमाचे स्वरुप- कार्यालयामध्‍ये स्‍वच्‍छता माहिम राबवून कार्यालयातील अभिलेख व दस्‍तऐवज यांचे वर्गीकरण व व्‍यस्‍थापन, निंदणीकरण व महत्‍वाच्‍या दस्‍ताऐवजांचे फेरीस्‍त यादी तयार करणे

५ ऑगस्ट –   “कृषी मार्गदर्शन कार्यक्रम” कार्यक्रमाचे स्वरुप- शेतकरी बांधवांसाठी शेती व शेतीविषयक कामे, बीबियाणे, खते, पशूसंवर्धन, पीक संरक्षण, धान्य साठवण, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन प्रक्रीया, बाजारपेठ उपलब्धता इ. विषयांबाबत विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, शासनामार्फत शेतकरी बांधव, अल्पभूधारक इ. साठी राबविण्यात येणा-या विविध योजनांची प्रसिद्धीपत्रके तयार करुन त्यांचे वाटप करण्यात येणार आहे, जिल्ह्यातील / तालुक्यातील सर्व शर्तभंग प्रकरणे, तसेच वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर करणेची प्रकरणे, अतिक्रमण प्रकरणे नियमित करणे किंवा अतिक्रमण दूर करणे तसेच नझूल जमिनी यांबाबत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे, १००% ई पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे बाबत कार्यशाळा घेवून जनजागृती करणे, शेतकरी बांधवांना कृषी, पशूपालन इ. बाबत मार्गदर्शक आणि सहाय्यीभूत ठरणा-या संगणक प्रणाली तसेच मोबाईल अॅप्लिकेशन यांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

६ ऑगस्ट –   “शेती, पाऊस आणि दाखले” कार्यक्रमाचे स्वरुप – पुर्व मान्सुन व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस/अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे / शेतीचे / फळबागांचे / जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत, आपत्‍ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार, बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्यात आली आहे किंवा कसे, याबाबत सर्व कार्यालयान आढावा घेऊन पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार

 ७ ऑगस्ट –   “युवा संवाद” कार्यक्रमाचे स्वरुप- दहावी/बारावी/ पदवी/पदवीका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच रोजगारासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वय, वर्ष व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले/प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून संबंधित अर्जदारांना सदर दाखले/प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार

८ ऑगस्ट –   ” महसूल- जन संवाद ” कार्यक्रमाचे स्वरुप- महसूल अदालतींचे आयोजन करुन जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे/अपिले निकाली काढण्यात येणार आहेत, सलोखा योजना, गावा-गावांतील व शेतातील रस्ते, पांदण रस्ते, शिव रस्ते यांवावत तलाठी/मंडल अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात येणार, जमिनीविषयक आवश्यक असणा-या नोंदी अद्यावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येणार

९ ऑगस्ट –   ” महसूल ई-प्रणाली ” कार्यक्रमाचे स्वरुप- ई चावडी अचूक जमीन महसूल मागणी निश्चिती करणे व ऑनलाईन जमीन महसूल भरणे याबाबत जनजागृती करणे, हस्तदोष / तांत्रीक दोष यामुळे महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कलम १५५ प्रमाणे तहसिलदार यांचे स्थरावरील प्रलंबित आदेशांबाबत कार्यवाही करणे, ई-फेरफार तक्रार नोंदी निर्गती मुदत संपलेल्या सर्व फेरफार नोंदी निर्गत कराव्यात तसेच रद्द फेरफार नोंदीच आढावा घेण्यात येणार, ई-हक्क प्रणाली सह महसूल विभागाच्या उपलब्ध ऑनलाईन सुविधा बाबत जनजागृती करणे, “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार

१० ऑगस्ट –   ”सैनिक हो तुमच्‍यासाठी” कार्यक्रमाचे स्वरुप- संरक्षरण दलातून सेवानिवृत्‍त झालेल्‍या अधिकारी / कर्मचारी यांचे घरासाठी / शेतीसाठी जमीन वाटपा संदर्भात कार्यवाही करणे तसेच महसूल विभागामार्फत देण्‍यात येणारे विविध दाखले / प्रमाणपत्र सैनिकांच्‍या कुटूंबीयांना वाटप करणे. तसेच जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांचे कार्यालयात प्राप्‍त प्रलंबित प्रश्‍न निकाली काढणे.

११ ऑगस्ट –   “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन” कार्यक्रमाचे स्वरुप- विविध प्रकारच्या आपत्तींना प्रतिबंध करण्यासाठी आणि तिच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजनांना निश्चित करण्यात याव्यात. जिल्हयातील कोणत्याही आपत्तीला किंवा इशाराप्राप्त आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कार्यक्षमतेच्या स्थितीचा आणि सज्जतेबाबतच्या उपाययोजनांच्या आढावा घेण्यात येणार, आपत्तीस प्रतिबंध करण्यासाठी किंवा स्थानिक प्राधिकरणे, शासकीय व अशासकीय संघटनांच्या सहाय्याने तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध स्तरावरील अधिका-यांसाठी, कर्मचा-यांयाठी, नागरीकांसाठी आणि स्वंयप्रेरणेने बचाव करणा-या कार्यकर्त्यासाठी विशेषीकृत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार

१२ ऑगस्ट –   ”एक हात मदतीचा दिव्‍यांगाच्‍या कल्‍याणाचा” कार्यक्रमाचे स्वरुप- या अनुषंगाने दिव्‍यांग व्‍यक्‍तींकरीता शासनाच्‍या वतीने राबविण्‍यात येणा-या विविध योजना/उपक्रमांबाबतची माहिती देवून त्‍यांना आवश्‍यक असणारे विविध दाखले देणेबाबत शिबीर आयोजित करणे.

१३ ऑगस्ट – महसूल अधिकारी/कर्मचारी” यांचेसाठी संवाद व प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरुप- महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, विविध शासकीय योजना, जमीन विषयक प्रकरणे, जिल्हा स्तरीय महसूली कामे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन इ. विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सेवानिवृत्त / कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधित विषयाबाबत मार्गदर्शन

१४  ऑगस्ट –   “महसूल पंधरवडा वार्तालाप” कार्यक्रमाचे स्वरुप-  पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद , महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या अनुषंगाने “यशोगाथा” पत्रक तयार करुन प्रसारमाध्यमांना वितरीत करण्यात येणार (नवीन डी.पी.डी.सी. हॉल जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सकाळी 11.00 वाजता)

१५  ऑगस्ट –   “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ” कार्यक्रमाचे स्वरुप- उत्कृष्ट काम करणा-या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, वाहन चालक, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून गौरव-सन्मान करण्यात येणार,

प्रतिक्रिया व्यक्त करा