ऑफलाइन धान्य देण्यास शासनाची मंजुरी, रेशन कार्ड धारकांनी तातडीने धान्य घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या दुकानांमध्ये ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही त्यांनी जुलै महिन्याचे धान्य ऑफलाइन सुविधा द्वारे वाटप करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. ज्यांनी जुलै महिन्याचे धान्य उचललेले नाही त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये धान्य उचलून घ्यावे असे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.