You are currently viewing आषाढी अमावस्या….

आषाढी अमावस्या….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*आषाढी अमावस्या*…..

 

*आली आखाडी आवस*

*सण दिव्यांचा घेवून*

*शान वाढवी संस्कार*

*परंपरा जोपासून*

 

*ओटी सणांना घेऊन*

*लागे श्रावण चाहूल*

*घरदार सजविले*

*दिनी दुसऱ्या पाऊल*

 

*उजळीता दीप सारे*

*कसा लोपला अंधार*

*झुला श्रावण खेळता*

*कोण आळवी गंधार*

 

*दुष्ट प्रवृत्ती टाळून*

*सकारात्मकता मना*

*सूर ओंकार घुमता*

*फलदायी आराधना*

 

*गोड नैवेद्य सांगता*

*दीप अमावस्या सणा*

*तेजोमय प्रकाशाने*

*उजळूया हरक्षणा*

 

*आषाढीची अमावस्या*

*दीप पूजा घरोघरी*

*सुरू झाला चातुर्मास*

*मुखी जपू हरी हरी*……

 

*शब्दांकन*…

*सौ.. पुष्पा सदाकाळ..पुणे*

*9011659747*

प्रतिक्रिया व्यक्त करा