You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेच्या भोसले गार्डन शेजारील रस्त्याला येतं नाल्याचं स्वरूप

सावंतवाडी नगरपालिकेच्या भोसले गार्डन शेजारील रस्त्याला येतं नाल्याचं स्वरूप

*सावंतवाडी नगरपालिकेच्या भोसले गार्डन शेजारील रस्त्याला येतं नाल्याचं स्वरूप*

*प्रशासन सुशेगाद, शाळकरी मुलांचे आणि नागरिकांचे हाल*

सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केले आणि नागरिकांना प्रवासासाठी खड्डेमय असलेला रस्ता गुळगुळीत करून दिला. परंतु सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने जोरदार पाऊस सुरू होताच रस्त्यावर गुढगाभर पाणी साचते आणि मिलाग्रिस शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांना कपडे भिजवून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. भोसले उद्यानाच्या मागील सालईवाडा भागातील नागरिक तर नित्य या रस्त्यावरून चिखलयुक्त पाण्यातून वाट काढत असतात परंतु झोपी गेलेल्या सावंतवाडी नगरपालिकेला पाण्यासाठी वाट करावी असे वाटत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सावंतवाडी नगरपरिषदेने रस्ता करताना रत्याला आवश्यक असलेले गटार बांधले नाहीत, तर गार्डनच्या कंपाऊंड वॉलला भोक मारून पाणी नाल्यात सोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या भोकातून पाणी निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहते. जेल पासूनच्या परिसरातून येणारे पाणी याच रस्त्यावर वाहत येत असल्याने त्याठिकाणी पूर्वी पासून गटार तयार केला होता, त्यामध्ये सैनिक हॉस्टेलच्या लोकांनी स्लॅब अथवा पर्यायी फरश्या न घालता गटार बुजवून आपल्या गेट मधून आत जाण्यासाठी वाट तयार केली. एकीकडे शहरातील बांधकाम व्यावसायिक अथवा घर मालकांची बांधकाम साईटवर असलेली वाळू, खडी गटारात आल्यास १० हजार रुपये दंड वसूल करणारी सावंतवाडी नगरपरिषद सैनिक हॉस्टेलने गटार बुजवल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून का राहिली..? असा सवाल सालईवाडा भागातील नागरिक करत आहेत.
सावंतवाडी शहरातील भर बाजारपेठेतील रस्ते डांबरीकरण करून तीन महिने उलटले नाहीत अन् पहिल्या पावसात नगरपालिका प्रशासनाचे उत्कृष्ट कार्य जागोजागी खड्डे पडले किंवा पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे पालिकेच्या कामांचा दर्जा सावंतवाडी करांना याचि देही याचि डोळा दिसला आहे. त्यामुळे टक्केवारीच्या तालात केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी कामे करून घेतात की काय..? असे आज प्रत्येक सावंतवाडीकर नागरिक बोलताना दिसून येते. घरपट्टी, पाणीपट्टी, वृक्ष, स्वच्छता, शिक्षण असे विविध कर वसूल करण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला नागरिकांचे हाल होताना दिसत नाहीत का? असा सवाल उभा राहिला आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा