You are currently viewing जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सांगुळवाडी येथे स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सांगुळवाडी येथे स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

*जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सांगुळवाडी येथे स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

वैभववाडी

*जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागाच्यावतीने सांगुळवाडी येथे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले.*
दरवर्षी जगभर २८ जुलै हा दिवस ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ म्हणुन साजरा केला जातो. पृथ्वीवरील निसर्गाचे महत्त्व लोकांना समजावे व त्यांनी निसर्गाची काळजी घ्यावी, निगा राखावी व संवर्धन करावे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संरक्षणाची व संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी म्हणुन वैभववाडी महाविद्यालयातील एन.एस.एस व एन.सी.सी विभागांच्यावतीने मंगळवार दिनांक ३० जुलै रोजी सांगुळवाडी येथील प्राथमिक शाळा, बस थांबा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील सांगुळवाडी-नावळे या रस्त्याच्या दोन्हीं बाजुला वृक्षारोपण कऱण्यात आले.
या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील एन.एस. एस. व एन.सी.सी. विभागांतील विद्यार्थी व या विभागातील सर्व शिक्षक डॉ.माणिक चौगुले, प्रा. रमेश काशेट्टी, डॉ.संतोष राडे व प्रा.राहुल भोसले यांनी सक्रीय सहभाग घेतला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांमार्फत करण्यात आले होते.

______________________________
*संवाद मीडिया*

_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…

🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️

*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*

▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_

* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_

* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_

⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕

*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*

अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…

https://wa.me/919766670706

-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*,

प्रतिक्रिया व्यक्त करा