You are currently viewing मुंबई विद्यापिठ आयोजीत ‘युवा महोत्सवा’मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने पटकावली 2023-24 ची चॅम्पीयन ट्राॅफी

मुंबई विद्यापिठ आयोजीत ‘युवा महोत्सवा’मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने पटकावली 2023-24 ची चॅम्पीयन ट्राॅफी

मुंबई विद्यापिठ आयोजीत ‘युवा महोत्सवा’मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने पटकावली 2023-24 ची चॅम्पीयन ट्राॅफी

सिने कलाकार मा.शिवाजी साटम यांच्या हस्ते मुंबई येथे चॅम्पीयन ट्राॅफीचे वितरण

सावंतवाडी.

शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये, मुंबई विद्यापीठ मुंबई , ‘ विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा’ महोत्सव 2024 अंतर्गत वैभववाडी महाविद्यालय येथे झालेल्या, झोनल( जिल्हास्तरीय) स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयास एकूण बारा पारितोषिके मिळाली होती.
मुंबई येथे चॅम्पीयनशीप ट्राॅफी सांस्कृतीक विभाग समन्वयक डाॅ.एस.एम.बुवा यांनी प्रसिद्ध सिनेकलाकार शिवाजी साटम यांच्या हस्ते स्विकारली. याप्रसंगी मुंबई विद्यापिठ प्र कुलगूरु डाॅ.अजय भामरे,मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष संचालक डॉ. सुनील पाटील,मुंबई विद्यापीठ कला व सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. निलेश सावे उपस्थित होते.
गुरुवार दिनांक 11 /7/ 2024 रोजी शिरगाव महाविद्यालय तालुका देवगड येथे मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित, एक दिवसीय कार्यशाळे मध्ये असे जाहीर करण्यात आले की, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण 12 पारितोषिके मिळवून जिल्ह्यामधून ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मिळवली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठ कला सांस्कृतिक विभाग समन्वयक माननीय निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक व विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. एम. ए. ठाकूर, कला व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. डी.जी. बोर्डे, सह समन्वयक डॉ. एस. एम. बुवा, डॉ. एस. ए. देशमुख, प्रा.आर. के. शेवाळे, प्रा. हर्षदा परब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. करिता महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे व कला सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा