You are currently viewing वंजारींच्या आरोपांत तथ्य नाही : महेंद्र सांगेलकर

वंजारींच्या आरोपांत तथ्य नाही : महेंद्र सांगेलकर

वंजारींच्या आरोपांत तथ्य नाही : महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी :

सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विलास गावडे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसा ठराव सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला कार्यकारिणीत आम्ही घेतला आहे. समिर वंजारी हे कार्यकारिणीत नाहीत. ते तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य नाहीत. त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. ते जर पदाधिकारी असते तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली असती अशी माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली. पक्षात कोणी दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमची बैठक झाली होती. या बैठकीत सावंतवाडी मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. कॉग्रेससाठी सावंतवाडी मतदारसंघ योग्य असल्याची भावना आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. लोकसभेत गावागावात कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क बघता आपला उमेदवार कोण असावा अशी चाचपणी केली. १५ दिवसांपूर्वीच्या जिल्हास्तरीय बैठकीत पक्षनिरीक्षक नेमून आढावा घेण्यात आला. यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या तालुका कॉग्रेसच्या बैठकीत विलास गावडे उमेदवार असावेत यासाठीची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली‌. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गचा हा अहवाल पक्षनिरीक्षकांकडे आम्ही पाठवला आहे. निर्णय घेण्याच काम इंडिया आघाडीचे वरिष्ठ करतील. मात्र, विलास गावडे हे उमेदवार असावेत यासाठी आमचा आग्रह आहे अशी माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली.

दरम्यान, आमची मागणी तालुका कॉग्रेसच्या बैठकीत केली आहे. समिर वंजारी कार्यकारिणीत नाहीत. ते तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. ते पदाधिकारी असते तर तात्काळ कारवाई केली असती. मात्र, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षात कोणी दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले. यावेळी अँड राघवेंद्र नार्वेकर,विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, रवींद्र म्हापसेकर, शिवा गावडे, संदीप सुकी, संजय लाड आदी उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा