*भाजप च्या निवेदनाची दखल न घेतल्या बद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कडे तक्रार*
*संबंधितांवर कारवाई झाली नाही तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग* .
भाजपा च्या वतीने मुख्याधिकारी , वेंगुर्ले नगरपरिषद च्या नावे प्रशासकीय कार्यकाळ सुरु झाल्यापासूनची कार्यालयामार्फत झालेल्या विविध विकासकामांची माहीती मागितली होती .
यामध्ये शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवलेल्या कामांची नावे , प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामाची यादी , निविदा प्रक्रीया केलेल्या कामांची यादी , कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या आदेशाची प्रत , कंत्राटदाराच्या कामासह पुर्ण केलेल्या कामांच्या अदा केलेल्या बिलांची माहीती , कंत्राटदारांने निविदा भरताना कमी दराने भरुन सुद्धा , अंतिम बिलाच्या वेळी वाढीव रक्कम अदा केलेल्या कामांची माहीती ( वाढीव कामांच्या अंदाजपत्रकासह ) , झालेल्या विकास कामामध्ये वापरण्यात आलेली खडी / वाळु / बोल्डर इत्यादी साहीत्यांचे शासकीय नियमानुसार परवान्याची माहीती ( राॅयल्टी पास ) इत्यादी माहीती दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदनाद्वारे मागितली होती . परंतु सात महीने झाले तरी वेंगुर्ले नगरपरिषदेकडुन अद्याप कोणतीही माहीती प्राप्त झाली नाही .
खर तर वेंगुर्ले नगरपरिषदेस राज्य सरकार व केंद्र सरकार च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला , परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाने ठेकेदारांना हाताशी धरून गरज नसलेल्या ठिकाणी निधी खर्ची घालून शासनाच्या निधीचा अपव्यय केला . याबाबत माहीती मिळण्याबाबत निवेदन सादर केले असता अद्याप कोणत्याही प्रकारची माहीती दिली नाही . म्हणूनच जिल्हाधिकारी किशोर तावडे साहेबांची भेट घेऊन वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली . या तक्रारीची दाखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली नाही तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेबांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
______________________________
*संवाद मीडिया*
_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत
इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…
🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️
*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*
▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_
* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_
* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_
⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕
*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*
अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…
https://wa.me/919766670706
-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*