You are currently viewing मुक्ताई फाऊंडेशन, चोपडा आयोजित दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन, पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

मुक्ताई फाऊंडेशन, चोपडा आयोजित दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन, पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

चोपडा : येथील संजीवनी नगरातील मराठा सभागृहात दिनांक २८जुलै २०२४ रोजी कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.

या कवी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका आणि समाजसेविका मा. ताईसाहेब आशाताई रंधे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.डॉ. कुणाल पवार जिल्हाध्यक्ष खान्देश साहित्य संघ जळगाव यांनी भूषविले. मंचावर मा. विलास पाटील कार्याध्यक्ष मसाप पुणे शाखा चोपडा, मा. इंदिरा जाधव ज्येष्ठ साहित्यिका, समाजसेविका जळगाव मा. विजय कुमार कस्तुरे ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध गझलकार बुलढाणा, मा. एकनाथ पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जळगाव, मा. जितेंद्र पाटील अध्यक्ष मुक्ताई फाउंडेशन चोपडा, मा.रूपाली मोरे, संस्थापिका मुक्ताई फाउंडेशन चोपडा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रारंभी स्वागतगीत कवी जीवन मोरे पारोळा यांनी गायले.

पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कवी पानाचंद चौधरी यांचे सिद्धांत या कवीता संग्रहाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण,प्रेम गझल, मुक्तहस्त कविता सादरीकरण, तसेच कथाकथन देखील कवी संमेलनात उत्साहात सादर करण्यात आले.

या राज्यस्तरीय कवी संमेलनास राज्यभरातून कवींनी उपस्थिती दिली.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन आर.एस.गवळे, वंदना गवळे, जीवन मोरे यांनी केले. आभार मुक्ताई फाउंडेशनच्या संस्थापिका रूपाली मोरे यांनी मानले.

कवी संमेलन यशस्वीतेसाठी मा . जितेंद्र पाटील, मा रुपाली मोरे, मा योगेश हरणे, मा.गौरव पुंडे, आदींनी परिश्रम घेतले.

कवी संमेलनातील कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा