*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*
*काव्यपुष्प – ५६ वे*
————————————–
श्री गजानन विजय ग्रंथात । उपदेश बोल शब्दांत ।
सार जीवनाचे यात । जे सांगती स्वामी साक्षात ।।१ ।।
उमरावतीस असता । स्वामी बोलती भक्ता । सांगावे
मनातले न संकोचता । कार्य सुलभ होई ।। २ ।।
गणेश श्रीकृष्ण खापर्डे ।। उमरावतीचे प्रस्थ बडे । वकिलीत
सर्वांच्या पुढे । भक्त श्रद्धाळू असती हे ।। ३ ।
दादासाहेबांनी आग्रह केला । स्वामी आले त्यांच्या घराला ।
सोहोळा पूजेचा झाला । यथासांग हो ।। ४ ।।
भाविकांची मनोभावना । घरी न्यावे स्वामींना । परी हिम्मत त्यांची होईना । स्वामींना विचारण्याची ।।५ ।।
भाविक चंद्राबाई बोले पतीला । गणेश आप्पाला । ईच्छा झाली मनाला । सदानी बोलवावे साधूला ।। ६ ।।
अप्पा म्हणे पत्नीला । नाही आपला वशिला । ना वजन शब्दाला । कसे बोलावे ? ।। ७ ।।
भक्तांच्या मनातले । स्वामीनी जाणले । आप्पास म्हणाले।
जाऊ या, तुझ्या सदानी ।।८ । ।
पती-पत्नी आनंदले । स्वामींना घरा नेले ।। पूजन त्यांचे केले । अर्पिला संसार श्री गजानन चरणी हो ।। ९ । ।
*********************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
—————————————-कवी- अरुणदास- अरुण वि. देशपांडे- पुणे.
—————————————–