You are currently viewing मेघ

मेघ

*ज्येष्ठ कवयित्री चित्रकार स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मेघ*

 

कुठून दाटले मेघ उरी हे

पाणावलेल्या पापण्यात

स्वप्न उतरले,नक्षीदार हे

चित्रदिसे मौक्तिक सरीत.

 

निशब्द होती अधर बोलके

स्तब्ध शांतता गहिवरली

धुक्यात कां पाऊल थबके

दाट अंधारात वाट हरवली

 

सारे आरव का थांबून गेले

कुठे काजवे हळू चमकले

रानदर्प घमघमत राहिला

बेधुंद वारे वेडेपिसे जाहले

 

अवखळ धून बेभान बासरी

रानीवनी दूर वाजत राही

कृष्णवेडी राधा होई बावरी

ध्यानीमनी कान्ह्याला पाही.

💐कृष्णवेडी राधा 💐

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा