You are currently viewing डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा: भर सभेत संत सचिन देव महाराज यांची मागणी

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा: भर सभेत संत सचिन देव महाराज यांची मागणी

अमरावती दि .30-

 

शिक्षण महश्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी भारताच्या नकाशावर शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी व दींनदुबळ्यांसाठी प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलेले आहे. भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची नोंद इतिहासात झाली आहे. अशा या महापुरुषाला त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र शासनाने गौरवावे असे जाहीर आवाहन श्री संत अच्युत महाराज यांचे पट्ट शिष्य श्री संत सचिन देव महाराज यांनी आज अमरावती येथे केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. आपल्या प्रखर वाणीतून त्यांनी या विषयाला हात घातला व डॉ पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे त्याला सहकार्य करण्याचे करण्याची विनंतीही त्यांनी उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांन आजीव सभासदांना तसेच उपस्थिताना केली ..या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीप इंगोले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते प्र कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री गजाननराव फुंडकर दुसरे उपाध्यक्ष श्री भैय्यासाहेब पाटील पुसदेकर तिसरे उपाध्यक्ष श्री केशवराव मेतकर कार्यकारिणीचे सदस्य व स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव श्री हेमंत काळमेघ श्री शिवाजी सोसायटीचे कार्यकारी सदस्य सर्व प्राचार्य श्री केशवराव गावंडे सुरेश खोटरे सुभाष बनसोड संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विजय ठाकरे डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री नरेश पाटील उपाध्यक्ष श्री प्रशांत डवरे व दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती कीर्ती अर्जुन ह्या उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला .अशा या महापुरुषाला भारतरत्न देणे म्हणजे भारतरत्न पुरस्काराची उंची वाढवणे असे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हा पुरस्कार मिळणे 125 व्या जयंतीनिमित्त संयुक्तिक आहे असेही प्रतिपादन त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून केले. सर्वांनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. श्री संत सचिन देव महाराजांच्या वाणीतून निघालेला हा भारतरत्न विषय काल स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात चर्चेचा विषय होता. या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वच आजीव सभासद तसेच लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्री दिनेश सूर्यवंशी. तुषार भारतीय. माजी महापौर श्री चेतन गावंडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री पप्पू पाटील . माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र तायडे सुप्रसिद्ध उद्योजक श्री शिवाजीराव झोंबाडे यांनी देखील श्री संत सचिन देव महाराजांचे हे विधान उचलून धरले असून डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न प्राप्त व्हावे यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत असेही सांगितले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी संपूर्ण भारतातून प्रयत्न सुरू असून विदर्भातून देखील या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रमाला विदर्भाच्या 11 जिल्ह्यातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आजीव सभासद व दादासाहेब काळमेघ यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री संत सचिन देव महाराज यांच्या वाणीतून ही घोषणा झाल्यामुळे हा संदेश 11 जिल्ह्यातील लोकांपर्यंत गेला असून त्याची फलश्रुती लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रकाशनार्थ प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा