You are currently viewing वीजग्राहकांना चांगली सेवा दिली नाही तर तीव्र आंदोलन  ‌छेडणार – शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा 

वीजग्राहकांना चांगली सेवा दिली नाही तर तीव्र आंदोलन  ‌छेडणार – शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा 

वीजग्राहकांना चांगली सेवा दिली नाही तर तीव्र आंदोलन  ‌छेडणार – शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा

शिवसेना उबठाचा महावितरणला काही दिवसाचा अल्टिमेटम

पुढच्या तीन आठवड्यात महावितरणची सेवा सुरळीत होईल महावितरणने दिला विश्वास

सावंतवाडी :

वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्याचे काम खरेतर सावंतवाडीच्या आमदारांचे होते पण ते करू शकले नाहीत. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील वीजग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जर महावितरणने यावर तोडगा काढून वीजग्राहकांना चांगली सेवा दिली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला. शिवसेना उबाठा गटाच्या सावंतवाडी विधानसभा पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांच्या कार्यालयाला धडक देत त्यांना घेराओ घातला. त्यांनतर श्री. धुरी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महावितरणबाबत असलेल्या विविध समस्यांनी वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांच्या कार्यालयाला धडक देत त्यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला. शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यानी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यलयावर धडक दिली. महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांच्यासमोर वीज ग्राहकांच्या समस्यांचा पाढाच या पदाधिकाऱ्यांनी वाचून दाखवला.
सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांमध्ये २०-२० २५-२५ दिवस लाईट नाही. वीज कर्मचारी फोन उचलत नाहीत. उद्धट उत्तरे देतात, ठेकेदार नीट कामे करत नाहीत, वर्षानुवर्षे जुन्या साहित्याचाच वापर होत आहे, डीपीडीसी मधून मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर नवीन प्लॉटिंग केलेल्या जागेत जातात, वीज वापर झालेला नसतांनाही भरमसाठ वीजबिले येतात, वीजग्राहकांना चांगली सेवा मिळत नाहीत, ठेकेदाराच्या हातात महावितरणचा कारभार त्यामुळे नीट कामे होत नाहीत, गेल्यावर्षी उभारलेले विद्युत खांब यावर्षी जमीनदोस्त होतात, ठकेदाराचे कामगार कामाच्या ठिकाणी राहत नाहीत, कृषिपंप बंद असून सुद्धा त्याचे बिल येते, कृषी पंपाला वीज माफी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना मिळते पण कोकणात का मिळत नाही ? अशा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. . दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी कंपनीची वीज मिळण्यात काय अडचणी आहेत, असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला. ट्रान्सफॉर्मचे स्ट्रक्चरलऑडिट करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर गणेशोत्सव झाल्यानंतरच महावितरणने वीज बिल वसुली करावी अशी मागणी करण्यात आली.
त्यांनतर प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील वीज ग्राहकांना खुप मनःस्ताप सहन करावा लागत आहे. ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर ताण येतो. महावितरणच्या उप अभियंत्यांना वाहन व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांची कामे वेळात होत नाहीत. त्यांना चारचाकी वाहने उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी श्री. धुरी यांनी केली. हत्ती हटाव मोहिमेमध्ये जसे हाकारे उपलब्ध करून दिले त्या प्रमाणे महावितरणच्या कामासाठी खासगी मजूर उपलब्ध करून घ्यावेत. भाड्याने कटर घ्या, एकाचवेळी सावंतवाडी मतदार संघातील तिन्ही तालुक्यात काम सुरु झाले पाहिजे, अशी मागणी श्री. धुरी यांनी केली. अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी माहिती दिल्याप्रमाणे मुख्य वाहिनीवरील दुरुस्तीचे काम झाले आहे. फक्त ग्रामीण भागातील कामे व्हायची आहेत. पण आठ ते दहा दिवसांमध्ये ढासळलेली वीज यंत्रणा रुळावर येईल असे श्री. साळुंके यांनी सांगितल्याचे श्री. धुरी म्हणाले. काही उप अभियंता उद्धट वागतात त्यांच्यावरही कारवी होणार आहे. वरिष्ठानी सूचना केल्याप्रमाणे आजचे आमचे आंदोलन हे सौम्य होते पण परिस्थिती सुधारली नाही तर मात्र शिवसेना उबाथ गटाच्या माध्यमातून उग्र आंदोलन केले जाईल. तीन महिन्यांनंतर आमची सत्ता आली तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला.
वीजग्राहकांना होत असलेला त्रास महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी मान्य केला. वादळ आणि मुसळधार पाऊस यामुळे महावितरणची सेवा खंडित होत आहे. पण मुख्य वाहिनी दुरुस्त होण्याचे काम झाले आहे. पुढच्या तीन आठवड्यात महावितरणची सेवा सुरळीत होईल असा विश्वास श्री. साळुंके यांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, संजय गवस, महिला आघाडी भारती कासार, तालुका संघटक मायकल डिसूजा, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, संदीप माळकर, आबा सावंत, शहर प्रमुख अजित राऊळ, शब्बीर मणियार, सुनील गावडे, पुरुषोत्तम राऊळ, विनोद काजरेकर, रमाकांत राऊळ, प्रशांत बुगडे, रवींद्र कादरेकर, विलास परब, सचिन मुळीक, श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनिता घाड़ी, नयनी शेटकर यांच्यासह शिवसेना उबाठाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

______________________________
*संवाद मीडिया*

_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…

🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️

*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*

▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_

* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_

* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_

⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕

*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*

अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…

https://wa.me/919766670706

-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा