You are currently viewing राष्ट्रवादीतर्फे शेतकऱ्यांना कसवण येथे एक हजार काजू कलमांचे वाटप…

राष्ट्रवादीतर्फे शेतकऱ्यांना कसवण येथे एक हजार काजू कलमांचे वाटप…

राष्ट्रवादीतर्फे शेतकऱ्यांना कसवण येथे एक हजार काजू कलमांचे वाटप…

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील कसवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना एक हजार काजू कलमांचे बाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमर सप्ताह साजरा करण्यात येत असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत कसबण येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना काजू कलमे वाटप, आरोग्य शिबीर, नेत्र शिबीर, मोफत औषध वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
काजू कलमांच्या वाटपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद म्हणाले, काजू कलमांच्या लागवडीतून अर्थकारण बदलण्याची ताकद आहे. काजूबीला राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर व देशाबाहेरही मागणी असते. त्यामुळे काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्यासाठीच आज एक हजार काजू कलमे गरजूंना वाटण्यात आली. या झाडांची योग्य ती निगा राखून संगोपन करा.
प्रदेश चिटणीस एम. के. गावडे म्हणाले, गावातील पडिक असलेल्या जमिनीवर उत्पन्न देणारी झाडे लाबा, काजूला चांगली मागणी व दर मिळतो. मोकळ्या जागेत काजू कलमांची लागवड करा, काजू लागवडीला शासनही प्रोत्साहन देत आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा
काजू कलमांच्या वाटपप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सावळाराम जणावकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष उर्फ बाबू सावंत, संदीप राणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर (कणकवली), वैमव रावराणे (वैभववाडी), नाथा मालंडकर (मालवण), आर. के. सावंत (कुडाळ), उदय मोसले (सावंतवाडी), संदीप पेडणेकर (वेंगुर्ले), रशीद खान (देवगड), सत्यवान गबस (दोडामार्ग), ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, जिल्हा सचिव सतीश पाताडे, प्रसाद कुलकर्णी, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, महिला कणकवली तालुकाध्यक्षा स्नेहल पाताडे, महिला कुडाळ तालुका उपाध्यक्षा उमा धुरी, युसुफ खान, कणकवली शहर अध्यक्ष इमरान शेख, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, सचिन अडुळकर, नितीश सावंत, शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, बाळू मेस्त्री, अंकुश मेस्त्री, उदय सावंत, तालुका सचिव किशोर घाडीगांवकर, कु. रिजा नाईक, कु. अली नाईक आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा