*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घाव जरा*
हा नियतीचा डाव जरा
सख्या दे ना घाव जरा
नव्हते कुठले अस्त्र शस्त्र
अरे देवा पाव जरा
अबोला धरला का असाही
हा कसा तुझा ठराव जरा
रात घायाळ अशीच सरते
सुगंधी हात धराव जरा
नव्हता दोष कसला रोष
प्रीतीने गन्ध उजळाव जरा
रात राणी बघ कशी दिसते
मोगऱ्या परी उमलाव जरा
कशी राहू तूझ्याविण मी
क्षितिवरती उष्मा द्यावं जरा
तुझे माझे अस्तित्व जुने
हट्ट माझा पुरवावं जरा
प्रा डॉ जी आर प्रविण जोशी
अंकली बेळगांव