*ज्येष्ठ लेखिका कवयित्री उपक्रमशील आदर्श शिक्षिका कथाकार सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस*
मुसळधार पावसात
कोसळतो आठवणींचा पूर!
सख्या जावू नकोस तू
माझ्या पासून दूर!
चिंब भिजणाऱ्या पावसात
हवी तुझी साथ..सोबत
तू नाही जवळ
बेचैन झालं मन
धो धो पडणाऱ्या पावसानं
झोडपलं निसर्गाला
तू नसता जवळ सख्या
भयभीत होते मनाला
निसर्गाचं नवीन आनंदी रुप
आपण दोन्ही मिळून पाहू
जन्मोजन्मी आपण
दोघं सोबतचं राहू..!
अनुपमा जाधव
💦💦💦💦🌹🌹🌹💦💦💦💦