You are currently viewing मालवणात बीच टेनिस खेळाची कार्यशाळा संपन्न…

मालवणात बीच टेनिस खेळाची कार्यशाळा संपन्न…

मालवणात बीच टेनिस खेळाची कार्यशाळा संपन्न…

मालवण

विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या बीच टेनिस या खेळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि एस्परर या स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विश्वजित सांगळे यांच्या कंपनीमार्फत मालवण येथील चिवला बीच येथील दर्यासारंग बीच रिसॉर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. मालवण मधील टोपीवाला हायस्कूलच्या ४४ विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

या कार्यशाळेचे आयोजन टोपीवाला हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आणि एस्परर कंपनीची सभासद काजल महेश कांदळगांवकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या कार्यशाळेप्रसंगी एस्परर कंपनीचे सीईओ विश्वजित सांगळे, बीच टेनिस फेडरेशन इंडियाचे उपाध्यक्ष तसेच बीच टेनिसचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे, मालवण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सामंत, सचिव विजय कामत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, क्रीडा शिक्षक श्री. वारंग, दर्यासारंग रिसॉर्टच्या प्रोप्रायटर सौ. स्मृती कांदळगांवकर, कार्यक्रमाच्या समन्वयक काजल कांदळगांवकर , वेदांत पोवळे, शांभवी हातखंबकर आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत उपस्थित खेळाडूना या खेळाची माहिती आणि प्रत्यक्ष खेळाची संधी देण्यात आली. या सहभागी सर्व खेळाडूना एस्परर कंपनीकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सध्या प्राथमिक स्तरावर एका शाळेतर्फे थोडक्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून भविष्यात सर्व शाळांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली जाईल, असे उन्नत सांगळे यांनी यावेळी सांगितले.

विश्वजीत सांगळे व उन्नत सांगळे यांनी मालवण सारख्या छोट्या शहरात या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल संस्था चेअरमन श्री. सामंत यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मालवण वासियांच्यावतीने या दोन्ही खेळाडूंना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा