*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जनतेची काळजी वाहणारा अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले अभिनंदन*
सावंतवाडी :
१५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन असो किंवा २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन जनतेला त्यांचे अधिकार आणि लोकशाहीने दिलेले हक्क याचे स्मरण करणारे हे राष्ट्रीय दिन असतात. मात्र आपण आजवर पहात आलो आहोत, की मागील अनेक वर्षे, अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून किमान या दिवशी तरी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळेल या आशेने अनेक नागरिक प्रशासनाला पूर्वसूचना देऊन उपोषणाला बसत असतात. लोकशाहीतील जनहिताच्या संकल्पनेला हे चित्र शोभा देणारे नाही.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी यावर्षी अशा तक्रारी असणाऱ्या आणि उपोषणाची नोटीस दिलेल्या नागरिकांच्या तक्रारीबाबत तातडीने दखल घेऊन त्या सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. जे विषय तातडीने सोडवता येतील ते ऑन द स्पॉट सोडवावेत ज्या तक्रारींना काही काळ लागणार असेल तर तो नेमका किती काळ लागेल हे स्पष्ट करत प्रशासनाने तक्रारदाराचे समाधान करावे अशा सख्त सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. हे सरकार जनतेचे आहे, त्यांच्या कामाबाबत दिरंगाई आणि चालढकल यापुढे सहन करणार नाही, अशी कठोर भूमिका घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनतेला दिलासा दिला आहे. सामान्य जनतेला न्यायासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय जनतेप्रतीची त्यांची संवेदना दाखवून देणारा आणि अभूतपूर्व, ऐतिहासिक असा असल्याचे भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सांगत सिंधुदुर्गवासीय जनतेच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.