You are currently viewing बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा – जावेद खतीब यांचे खा. नारायण राणेंना निवेदन

बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा – जावेद खतीब यांचे खा. नारायण राणेंना निवेदन

बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा – जावेद खतीब यांचे खा. नारायण राणेंना निवेदन

बांदा

बांदा हे वेगाने विकसित होणारे शहर असून शहरात बाजारीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात बाजारात आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. यासाठी शहरात मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. खतीब यांनी खासदार राणे यांची मुंबई येथे भेट घेतली.यावेळी बांदा शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र -गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा शहर वसले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक व मोठी बाजारपेठ बांदा आहे. बांदा शहरावर आजूबाजूचे ३० ते ४० गाव अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात बांदा शहर व दशक्रोशीत अग्निशमन बंबाच्या कमतरतेमुळे कित्येक एकर क्षेत्रातील शेती बागायती जळून खाक झाल्या आहेत. शहरात दुकानाना आग लागून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेले अग्निशमन बंब हे वेळेत उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागते. यासाठी आपल्या माध्यमातून बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून मिळावा. यावेळी शहरातील नियोजित तसेच संकल्पित विविध विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार राणे यांनी आपले बांदा शहरावर विशेष प्रेम असून बांदा शहरासाठी प्राधान्याने अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याचे तसेच शहरातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री खतीब यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा