You are currently viewing निरोप घेतो १२ कोटींचा

निरोप घेतो १२ कोटींचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निरोप घेतो १२ कोटींचा*

 

निरोप देऊन अठ्ठावीसाला

*लिहितो २९ वी कविता*

*संपत आली* वर्षे पाच

सराव करतो पुढचा आता

 

देऊन आश्वासने न पेलणारी

खड्डा खणतोय रोज स्व:ताचा

*ऋण काढून* सण साजरे

आदर करतोय *सर्व ताईंचा*

 

*तुमचे पैसे राज्य आमचे*

लागत नाही आता *आधार*

पिवळं पांढरं केशरी चालत

*पैसे आणतो आंम्ही उधार*

 

ताई माई आक्का कोणीही

अठरा करून पुरी आपली

त्वरीत घेऊन यावे *अर्ज*

सहासष्ट पासून पुढे फुली

 

बांधून रक्षा श्रावण पौर्णिमेला

भाऊबीज घालू *यंदा* आधी

नाही भरवसा आम्हा आमचा

पेन्शन आमचे “मिळेल” कधी

 

*निरोप घेतो* बारा कोटिंचा

*द्या निवडून* पुन्हा एकदा

भेटत राहू आणखी पाच वर्षे

म्हणतो आता आज अलविदा

 

विनायक जोशी✒️ ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा