*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गूढ*
*****
तुझ्यासंगे बहरले ऋतू तरीही
तूच हरवली कुठे कळले नाही
लळा लावूनी निघूनी गेलीस
मागे वळुनीही , पाहिले नाही
प्रीतीत गुंतलेलो होतो आपण
हे सत्य तूची कां जाणले नाही
विरहवेदना मी भोगत राहिलो
कां ? तुलाही ते जाणवले नाही
अशी कशी तू विसरून गेलीस
अजुनही मजला कळले नाही
जे घडले ते सांग कसे विसरावे
मीच कधी विसरू शकलो नाही
प्रीतीवीणही जगती जगता येते
कसे ? हे गूढ मला कळले नाही
************************
*रचना क्र. १५३*
*#©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*📞(9766544908 )*