You are currently viewing “स्टेटस चे “स्टेटस”

“स्टेटस चे “स्टेटस”

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*

 

*”स्टेटस चे *”स्टेटस”*

 

Whatsup वरील. *”स्टेटस*”

मला मुळातच हे कळत नाही की आपल्या वैयक्तिक स्टेटस पेक्षा whatsapp पर स्टेटस अधिक महत्त्वाचे आहे का? हे जरी मी दोन्ही बाजूंनी लिहीणार असले तरी मी प्रामाणिकपणे आधीच सांगते की मी ही स्टेटसची चाहती आहे. आणि दररोज एक नवीन थीम तयार करून मला आवडेल ते फोटो, चित्र ,माहिती, सुविचार किंवा चांगल्या गोष्टी टाकायला मला आवडतात. त्याचे दूरगामी किंवा क्षणिक परिणाम काय असतील माहिती नाही आजचंच उदाहरण घ्या काल आमच्या नणंदेकडे लग्नाचे जे मुहूर्त वडे झाले त्यातली उखाणे फोटो माहिती स्टेटसला मी सगळी टाकली.

पण काही वेळा वाटतं की आपल्या श्वासासारखं या स्टेटसवर आपण अवलंबून असतो. जेवण, झोप, स्वयंपाक ,व्यायाम,तसेच दररोज ते बदला काय टाकायचं त्याचा विचार करा ,उद्या कोणाचा वाढदिवस आहे, किती जणांनी ते पाह्यलय,किती लाईकस मिळाले याचा विचार कुठे सांगितला होता परत त्यातही काही खाष्ट सासू,मैत्रिणी जावा अशाही असतात की या मनात म्हणतात पहा ,बाईची किती मजा !रोज दिवसभर भटकत असते, हीचा नवरा बरा हीचं ऐकतो!

काहीजणी मात्र खरोखर आनंद घेतात ,पहिल्या पावसाचा नवीन कपातल्या चहाचा, ब्रह्म कमळाच्या फुलांचा ,नव्या ड्रेसचा नवीन काही शिकण्याचा, खरेदीचा ,पाहुण्यांच्या भेटीचा कुठे कार्यक्रमाला गेलेच, वाढदिवसांचा, हरकत नाही याची त्याची आवड आणि त्याचे समाधान!

पण गंमत ही वाटते की असे लाइक देणारे उघड उघड चार चौघात तिचं कौतुक कधीच करत नाही !त्यामुळे होतंय काय आपण या खऱ्या जीवनापेक्षा आभासी जगातच खूप रममाण असतो !आपल्याला पन्नास लोकांचे लाईक्स आले की आपण ग्रेट ही भावना वाढीस लागते. खरंतर आपण खूप काही करत नसतो! स्टेटसला फक्त आज काय खाल्लं, काय बनवलं, काय संपलं यापासून ते राजकारणापर्यंत सगळं काही टाकतो !कोणी विचार करत नाही की याचा खरंच उपयोग आहे का? कधी कधी तर विद्यार्थ्यांचा गृहपाठ हही आपण स्टेटसवर टाकतो, थोडा गमतीचा भाग आहे, पण अशा माऊली ना ही मी बघितलेलेय, जणू काही शिक्षक ते बघूनच गुणदान करणार आहेत!

या उलट काही….. गोइंग टू मुंबई म्हणत, प्रत्येक जाणारी स्टेशनं, प्रवास, खाद्यपदार्थ टाकत जातात ,जणू,” या चोरांना या! माझ्या घरात आहे काय नाही ते सगळं चोरून न्या असं सांगत नसावे?

खूप जण गाडी घेतली, बंगला घेतला, आपली श्रीमंती दाखवण्यासाठी स्टेटस ठेवतात, पण यातल्या खूपशा जणांना कोथिंबीर घेताना किंवा गणपतीची थोडीशी वर्गणी देतानाही मी कचकच करताना बघितलय! तसंच अजून एक… आपण म्हणतो सुविचाराने वागा, त्यात खूप ज्ञान संदेश आहे, पण आपण तसं वागतो का ?लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि *”स्टेटस वर सुविचार महान** असं काहीसं झालं य!

तेव्हा मित्र मैत्रिणींनो, व्हाट्सअप स्टेटस हे काही आपल्या आयुष्याचा *” स्टेटस सिम्बॉल*” नाही! ते केवळ एक मनोरंजनाचं साधन. !त्यात आपण काय ठेवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ! फक्त थोडं सद्विवेक बुद्धीने आणि आपला विचार योग्य ठेवून ते व्यवस्थित ठेवणं जास्त शहाणपणाचं आणि समर्पक ठरेल नाही का?

 

योगिनी वसंत पैठणकर नाशिक

(सदर विचार व लेखन माझे स्वतः चे आहे )

प्रतिक्रिया व्यक्त करा