*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*साहित्यात येणारी बळीराजाची उपमा*
लेख असो वा कविता अथवा कथा वा अन्य कुठलाही साहित्य प्रकार , त्यात बळी राजाचा उल्लेख हा शेतकरी संबंधाने येतो. शेतकर्याला बळीची उपमा देवून तत्कालीन जातीवाद प्रचारक राजकारणी नेते मंडळींनी समस्त शेतकरी हा ब्राह्मण विरोधात उभा रहावा यासाठी खेळलेला असत्कृती डाव होता. जो आजमितीस बर्याच अंशी उघडा पडलेला दिसतो व त्या राजकारण्यांची चुकलेली खेळी ही ७०%ते ८०% शेतकरी वर्गाच्या लक्षात आलेली दिसून येते . पण ही बळीची चुकीची उपमा साहित्यात अजून काही बंद होत नाही !! खरं तर ज्या राजकारण्यांनी चुकीचा प्रघात पाडला त्यांचे समर्थन करणारा साहित्तिक किंवा शेतकरी व बळी हे समीकरण इतिहासाचा अभ्यास नसल्याकारणाने न समजलेला साहित्तिक शेतकर्याला अजूनही बळीचीच उपमा लावतांना दिसतो. खरं काय ते जाणू या.
एक उल्लेख राहिला तो करतो . महात्मा फुले यांचे एक लिखाणातील ओळी गुगलवर सुद्धा दिसतात त्या अशा
*वामन का घाली बळी रसातळी ||*
*प्रश्न जोतीमाळी ||*
*करी भटा || (महात्मा फुले समग्र वाङ्ग्मय; पृष्ठ ५७२)*
मुळात वामनाने बळीला रसातळी का पाठवला ? हे वामनावतार वाचल्याशिवाय कसे कळावे ? पण या ओळीमुळे ही बरेच साहित्तिक रस्ता चुकलेले लिखाण करतांना आढळतात. वास्तविक जे व्यासांनी लिहिले वा अन्य ऋषिंनी लिहिले ते ब्राह्मणांनी सांभाळले . व्यास , विश्वामित्र , मनु , प्रभु श्रीराम , योगेश्वर कृष्ण हे जन्माने ब्राह्मण नव्हतेच ! व्यासांनी महाभारत दिलं , वाल्मिकींनी रामायण दिलं , विश्वामित्राने गायत्री मंत्र दिला , मनुने मनुस्मृति दिली , रामाने जगण्याचा आदर्श दिला व कृष्णाने जगावे कसे — विचार कसा करावा हे सांगितले . कायिक वाचिक व मानसिक पापे माणसाकडून होवू नयेत म्हणून गीता सांगितली. आणि विशेष म्हणजे वाल्मिकी सोडले तर महाराष्ट्रीय भाषेत हे सगळे क्षत्रिय म्हणजे मराठा होते , ब्राह्मण कुणीच नव्हते !!!! आहे की नाही मजा ?? आणि दैवासुर संपत्ती वा अवतारवाद वा यज्ञ वा राज्यशासन वा तत्कालीन राज्यव्यवस्था वा तत्कालीन पुराण संदर्भ अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय बळीला वामनाने रसातळी का घातला याचे उत्तर कसे सापडावे ? शिवाय स्वर्ग , नरक , पाताल , लोक (प्रदेश ) यांचे अर्थ समजल्याशिवाय लिखाण करणे म्हणजे आपणच आपल्या आपल्या ऋषिंना कमी लेखण्यासारखे आपणास नाही का वाटत ?
वास्तविक प्रत्येकाने इतिहास हा वाचलाच पाहिजे . आपली पुराणे हा आपला दैदिप्यमान इतिहास आहे , याची जाणीव प्रत्येक साहित्तिकाने राखावयास हवी. त्यातील आसुरी संपत्तीचे मंडन सोडून दैवी संपत्तीचे पालन करत आपले लेखन रंगवले पाहिजे.
बळी राजा म्हटलं की नजरेसमोर चटकन ज्याची प्रतिकृति येते तो वामनाने ज्याला पाताळात लोटले तो बळी राजा !!! हा *असुर* होता . असुर म्हणजे काय ? त्याची व्याख्या काय ? तर *असुषु रमन्ते इति असुरः ।* म्हणजे जे चांगले नाही त्यात जो रममाण होतो तो असुर !!!
मुळात बर्याचदा शब्दांच्या व्याख्या वा संदर्भ माहित नसतांना लिखाण होतं आणि हा आपला आहे म्हणून इतरांकडून असं कौतुक होतं की लिहिणारा चुकलाच नाही !!
आता बळी म्हणून जर हा बळी संबोधला तर माझा शेतकरी बांधव हा असुर वा राक्षस मुळीच नाही ! म्हणजे या बळीची उपमा अयोग्य आहे , हे लक्षात येते.
आता दुसर्या बळीकडे वळू या. दुसरा बळी ज्याला संबोधतात किंवा सांगतात तो *श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ बलराम* . याने दुर्योधनास गदा शिकवली पण त्याला त्याच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त करण्यास असफल असा दुर्योधनाचा अयशस्वी गुरु ! दुसरे म्हणजे ज्याचे हातात गदा व हल म्हणजे नांगर आहे , असा हा बलराम. *हा कुठल्याच राज्याचा शासक नव्हता !* श्रीकृष्णही राजा नाही व बलरामही राजा नाही !! श्रीकृष्णाचा मोठा भाऊ व अनंत शेषाचा अवतार असणारा हा हलधर जर कुठल्याच देशाचा राजा नव्हता आणि ज्याने शेतीच्या अवजाराचा शस्त्र म्हणून उपयोग केला तो बलभद्र वा बलराम हा आजच्या शेतकर्याची *बळीराजा* ही उपमा कशी असू शकतो ? हा मला पडलेला प्रश्न आहे. शिवाय हा बलराम कृष्णाने समजावल्यावर गप्प बसायचा बरं का !!! त्याची उदाहरणे ही इतिहासात आहेत !!! कृष्णाने इन्द्रपूजा बंद करवून गोवर्धनाची पूजा करण्यास लोकांना शिकवले . पुन्हा इन्द्र म्हणजे कोण ? देव नाही !!! तर त्या काळी जो राजा असायचा त्याला इन्द्र हे संबोधन असायचे !!! पण आम्हास काही माहीतच नसते !!! गोवर्धन पूजा म्हणजे पर्यावरणाची पूजा , वृक्ष लागवड , संगोपन आणि संवर्धन !! पण आम्ही पडलो ऐकीव अभ्यासू !!! तर आम्हास काय कळेल !! मराठीतील कितीतरी शब्द संस्कृतच असावेत !!! ते ही आम्हास माहित नाही !!! कवि हा शब्द संस्कृतच , मराठी नाहीच !!! तर बाकीचे काय !!!
दुसरे असे की बळी राजा ही महाराष्ट्रीयन नाही व बलराम ही महाराष्ट्रीयन नाही !!!! हे जेथील आहेत म्हणजे ज्या भागातील आहेत तेथील शेतकर्यांना कुणीच बळीची उपमा देत नाहीत !!! हे फक्त महाराष्ट्रातच चालते !! ते ही काही धाकापोटी वा काहींना राजीखुषी ठेवण्यासाठीच !!
मग , ज्या साहित्यात शेतकरी व बळी हे समीकरण आहे ते जर चुकीचे असेल तर त्याला साहित्तिक दर्जा परिक्षक वा अभ्यासकांनी वा पत्रकारांनी कसा द्यावा ? हा ही मोठाच प्रश्न उपस्थित होतो.
शेतकरी व बळी हे समीकरण केवळ राजकीय खेळी असेल तर त्याला साहित्तिक दर्जा कसा देता येईल ? याचा विचार प्रत्येक साहित्तिकाने करावयास हवा.
उत्तम ते घ्यावे । अधम टाकावे ।
शब्दामृत द्यावे । जनांसाठी ।।
🙏🙏🪷🪷
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.