मालवण :
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या शाखेशी संलग्न प्रगत विद्या मंदिर रामगड, या. मालवण येथे साने गुरुजी कथामालेची स्थापना मालवण तालुका अध्यक्ष श्री. सुरेश शामराव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सोबत उपाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, मुख्याध्यापक अंकुश वळंजू, शिक्षक संभाजी कांबळे, दिनेश सावंत, महादेव पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कथा : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर श्री. सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कथा निवेदकासाठी आवश्यक असणारे गुण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साने गुरुजी कथामाला का सुरू करण्यात आली? कथामालेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना होणारे फायदे, कथामाधा उपक्रमांची स्वरूप याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गाणी, गप्पा, गोष्टी अशा स्वरूपात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सूत्रसंचलन दिनेश सावंत यांनी केले. स्वागत व आभार महादेव पवार यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही चालवू हा पुढे वारसा, खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर केली. यामध्ये प्रार्थनेत सहभागी विदयार्थीनी :-
१)कु.निकीता लक्ष्मण हाटले
२)कु.चैताली रविंद्र सांडवे
३)कु.चिन्मयी अजय शिंदे
४)कु.सानिका सुनिल घाडीगांवकर
५)कु.सानिका संदिप तांबे
६)कु.मंजिरी रमाकांत सादये
७)कु.मानसी मंगेश चव्हाण
८)कु.प्रांजली संदेश लाड
९)कु.श्रावणी गुरूदास जिकमडे
संगीत साथ देणारे विदयार्थी:-
१)कु.साहिल निलेश लाड
२)कु.श्रवण कृष्णा बाईत
३)कु.भावेश समीर पालांडे
कथामालेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम नियमित चालू ठेवू असा विश्वास मुख्याध्यापक श्री. वळंजु यांनी व्यक्त केला.